'२०१९'च्या तयारीला लागा;मोदींचा भाजप खासदारांना आदेश

'२०१९'च्या तयारीला लागा;मोदींचा भाजप खासदारांना आदेश

चहापानाच्या निमित्ताने मोदींनी खासदारांशी संवाद साधला.

  • Share this:

नवी दिल्ली,3 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक घेतली. तेव्हा 2019 च्या निवडणूकीच्या तयारीला लागायची सूचना त्यांनी खासदारांना केली. ही बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. चहापानाच्या निमित्ताने मोदींनी खासदारांशी संवाद साधला.

'केंद्रातल्या योजना लोकांपर्यंत पोचवा, त्यांच्या समस्या जाणून घ्या, आणि तो अभिप्राय सरकारपर्यंत पोचवा', असंही मोदी म्हणाले. तसंच मोदींनी वंचित घटकांपर्यंत जास्तीजास्त पोचायची ही सूचना खासदारांना दिली. विकासाच्या योजना जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवायला ही त्यांनी सांगितलं. यावेळी नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी खासदारांनी मोदींना गेल्या तीन वर्षातल्या योजना आणि त्यांचा किती सकारात्मक परिणाम झाला आहे याचीही माहिती मोदींना दिली. सध्या भाजपचे 23 खासदार महाराष्ट्रात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 09:53 PM IST

ताज्या बातम्या