पंतप्रधान मोदींनी युवकांना केलं स्वच्छ भारत इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्याचं आव्हान

पंतप्रधान मोदींनी युवकांना केलं स्वच्छ भारत इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्याचं आव्हान

महात्मा गांधींचं 150वं जयंती वर्ष लवकरच आपण साजरं करणार आहे. तेव्हा त्यांचा स्वच्छतेचा मंत्र घरोघरी पोचवण्याची मागणी त्यांनी केली आहे

  • Share this:

29 एप्रिल: पंतप्रधान मोदींनी सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या  ,तसंच एनसीसी,एनएसएस च्या युवकांना पंतप्रधान मोदींनी समर इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्याचं आव्हान केलंय. आज मन की बातमध्ये त्यांनी यासोबतच अनेक गोष्टींचा उल्लेख केला.

महात्मा गांधींचं 150वं जयंती वर्ष लवकरच आपण साजरं करणार आहे. तेव्हा त्यांचा स्वच्छतेचा मंत्र घरोघरी पोचवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच आजच्या मन की बातमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांचं   त्यांनी तोंडभरून कौतूक केलं .तसंच त्यांना प्रोत्साहनही दिलं. याशिवाय फिट इंडिया कॅम्पेनचा उल्लेखही केला.यावेळी अक्षय कुमारचा एक व्हिडिओबद्दल त्यांनी माहिती दिली. मनरेगाबद्दलही ते बोलले. तसंच गुड न्यूज इंडिया या कार्यक्रमाचं कौतूक त्यांनी केलं.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांचा उल्लेख केला. प्रेषित मोहम्मद साहेबांचा ज्ञान आणि करुणेवर विश्वास होता. ते म्हणायचे की अहंकार ज्ञानाचा पराभव करतो. ते म्हणायचे गरजेपेक्षा जास्त तुमच्याकडे असेल तर ते दान करायला हवं.  रमझान जवळ आल्यानं त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

First published: April 29, 2018, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading