S M L

हा प्रकल्प होऊ नये यासाठी षडयंत्र रचलं गेलं-मोदींचा काँग्रेसला टोला

आज सकाळी प्रकल्पाचं लोकार्पण केल्यानंतर नरेंद्र मोदींनी सभेला संबोधित केलं. या सभेत विराट जनसागर उपस्थित होता. आम्हाला पक्षापेक्षा देश मोठा असंही यावेळी मोदी म्हणाले.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 17, 2017 02:49 PM IST

हा प्रकल्प होऊ नये यासाठी षडयंत्र रचलं गेलं-मोदींचा काँग्रेसला टोला

ढाबोई,17 सप्टेंबर: सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण होऊ नये यासाठी षडयंत्र रचलं गेलं असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं आहे. तो पूर्ण करण्यास अनेक अडथळे आणले गेले असंही ते म्हणाले. सरदार सरोवर प्रकल्पाचं लोकार्पण केल्यानंतर ढाबोई इथे ते बोलत होते.

आज सकाळी प्रकल्पाचं लोकार्पण केल्यानंतर नरेंद्र मोदींनी सभेला संबोधित केलं. या सभेत विराट जनसागर उपस्थित होता. आम्हाला पक्षापेक्षा देश मोठा असंही यावेळी मोदी म्हणाले. आदिवासींचं स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्या योगदानाचं महत्त्व कळण्यासाठी प्रत्येक राज्यात म्युझियम व्हावं अशी इच्छाही मोदींनी व्यक्त केली. तसंच सरदार वल्लभभाई पटेल जिवंत असते तर हा प्रकल्प खूप आधी पूर्ण झाला असता अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. सरदार साहेबांना त्यांच्या कार्याइतकं महत्त्व देण्यात आलं नाही असंही त्यांनी सांगितलं.

 

हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मदत करणाऱ्या महाराष्ट्र , मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचेही मोदींनी आभार मानले. तसंच या प्रकल्पासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या कामगारांचंही कौतुक यावेळी मोदींनी केलं. मी छोटी स्वप्न पाहणारा माणूस नाही जे करायचं ते भव्य दिव्य करणारा माणूस आहे आणि देशाचे लोक माझ्यासोबत आहेत असंही मोदी यावेळी म्हणाले.तसंच 2022 पर्यंत एक अजून विकसित भारत अस्तिवात येईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या सभेला वडोद-यातील गावट भागातील आदिवासी पांरपारिक वेषभूषेत आणि वाद्य वाजवत सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 02:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close