• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • आधुनिक महिलांना नको असतं मूल, पाश्चिमात्यांचा प्रभाव चिंताजनक; मंत्रीमहोदयांची मुक्ताफळं

आधुनिक महिलांना नको असतं मूल, पाश्चिमात्यांचा प्रभाव चिंताजनक; मंत्रीमहोदयांची मुक्ताफळं

आधुनिक महिलांना एकटं राहण्याची इच्छा असते आणि (Modern women don’t want kids even after marriage says Karnataka minister) मूल नको असतं, असं मत कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी व्यक्त केलं आहे.

 • Share this:
  बंगळुरू, 10 ऑक्टोबर : आधुनिक महिलांना एकटं राहण्याची इच्छा असते आणि (Modern women don’t want kids even after marriage says Karnataka minister) मूल नको असतं, असं मत कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी व्यक्त केलं आहे. लग्नानंतरही महिलांना मुलाला जन्म देण्याची इच्छा नसते आणि स्वतंत्र राहण्याकडे (women tries to live separately) त्यांचा कल असतो, असं ते म्हणाले. पाश्चिमात्यांचा प्रभाव उच्चशिक्षित महिलांवर पाश्चिमात्य देशांचा आणिं संस्कृतीचा प्रभाव असल्याचं डॉ. के. सुधाकर यांनी म्हटलं आहे. महिलांना स्वतः मूल जन्माला घालण्याची इच्छा नसते आणि मग त्या सरोगसीसाठी प्रयत्न करत राहत असल्याचं ते म्हणाले. जागतिक मनस्वास्थ्य दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज अनेक महिलांना स्वतंत्र राहण्यात रस असतो. भारतीय म्हणून आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. यासाठी पाश्चिमात्य संस्कृती जबाबदार असल्याचं सांगताना सध्याची पिढी आईवडिलांकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी सांगितलं. एकत्र कुटूंब पद्धतीचे गोडवे पूर्वी सर्वजण एकत्र कुटुंबात राहायचे. त्यामुळे लोक आपल्या मनातील भावना शेअर करू शकत असत. सध्या 10 पैकी 7 जणांना मानसिक आजारानं ग्रासलं आहे. वाढता ताणतणाव आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण हेच त्यामागचं कारण असल्याचं डॉ. सुधाकर यांनी सांगितलं. आपल्याला आपले आईवडील सोबत राहायला नको असतात. ही चिंतेची बाब असल्याचं ते म्हणाले. आजी-आजोबांसोबत राहण्याचा प्रकार तर आपण विसरूनच गेलो आहोत, असं त्यांनी सांगितलं. हे वाचा -कृतघ्न! आईला ‘ओम नमः शिवाय’ म्हणायलं सांगितलं, डोळे मिटताच विहिरीत ढकललं थोर भारतीय संस्कृती भारतीय संस्कृतीनं योग, प्राणायाम यांच्या माध्यमातून जगाला शिकवण दिली आहे. आज आपण आपल्या पूर्वजांनी दिलेली हीच शिकवण लक्षात ठेवण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताने कुणाचं अनुकरण करण्याऐवजी आपण संस्कृतीचं पालन केलं, तर सर्व जग आपलं अनुकरण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  Published by:desk news
  First published: