चेन्नई, 30 नोव्हेंबर : अगदी सिनेमात दाखवतात तसा चोर- पोलिसांचा थरारक पाठलाग प्रत्यक्षात फार कमी वेळा पाहायला मिळतो. पण अगदी फिल्मी स्टाइलने बाइकवरून धूम पळणाऱ्या मोबाईल चोरांचा एका पोलीस इन्स्पेक्टरने पाठलाग गेला आणि शेवटी त्याला पकडलं. हा सगळा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि या रिअल लाइफ हिरोचं कौतुक स्वतः पोलीस आयुक्तांनी केलं आहे. पोलीस इन्स्पेक्टरच्या या कर्तव्यतत्परतेचा VIDEO सोशल मीडियावर VIRAL झाला आहे.
ही घटना घडली चेन्नई शहरात. चेन्नईमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने असंच काही केलं त्यासाठी त्याचं खूपच कौतुक होत आहे. चेन्नईचे पोलीस आयुक्त महेश अग्रवाल यांनी स्वतः पोलीस उपनिरीक्षक अँटलिन रमेश यांचं कौतुक केलं आणि हा व्हिडीओ Twitter वर शेअर केला.
हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मोबाईल चोरून बाइकवरून धूम स्टाइल पळणाऱ्या चोरांचा सब इन्स्पेक्टर रमेश यांनी पाठलाग केला, हे या VIDEO मध्ये दिसत आहे. रमेश या चोरांपर्यंत पोहोचले. पण एकट्यानेच ही धरपकड करत असताना त्यातला एक चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. पण दुसऱ्याला रमेश यांनी पकडलं. पळून गेलेल्या चोराच्या मुसक्याही नंतर बांधण्यात आल्या.
एखाद्या चित्रपटामधला सिन असावा असं हे दृश्य आहे. पळणाऱ्या दोन चोरट्यांना पकडल्यानंतर आणखीन तीन जणांना अटक करण्यात आली. रमेश यांच्या या प्रयत्नांमुळे मोबाईल चोरांची गँग पकडली गेली. या चोरोट्यांनी आतापर्यंत चोरलेले 11 मोबाईल जप्त करण्यात आले.
It’s not a scene from any movie. But the real life hero SI Antiln Ramesh single handed chasing and catching a mobile snatcher riding a stolen bike. Follow up led to arrest of three more accused and recovery of 11 snatched/stolen mobiles. pic.twitter.com/FJYdoma7I4
— Mahesh Aggarwal, IPS (@copmahesh1994) November 27, 2020
नंतर महेश अग्रवाल यांनी Tweet द्वारे सब-इन्स्पेक्टर अँटलिन रमेश यांचे कौतुक केले. त्यांच्याशी संवाद साधला. या ट्वीटमध्ये पोलीस आयुक्त महेश अग्रवाल यांनी लिहिलंय, ‘हा कुठल्या चित्रपटातला प्रसंग नाही तर ही सत्यघटना आहे रियल लाइफ हिरो एसआय अँटलिन रमेश यांनी एकट्याने गाडीवरून पळून जाणाऱ्या मोबाईल चोराला पडकलं. पुढील तपासात आणखी तिघांना अटक झाली आणि 11 चोरलेले मोबाईल जप्त केले.’ तसेच चेन्नई पोलिसांनी देखील त्यांचा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून त्यांना पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे.
— Mahesh Aggarwal, IPS (@copmahesh1994) November 28, 2020
तसेच हा व्हिडिओ सगळीकडेच वायरल होऊन त्यावरती शुभेच्छांचा तसेच कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक ट्विटर युजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत व त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
हल्लीच्या काळात चोरीचे प्रमाण अधिकच वाढत आहे त्यात प्रत्येकानेच सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी आपण स्वतः घ्यायला हवी. आधीही चोरीचे प्रमाण जास्त होते परंतु आता कोणाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे चोरीचे प्रमाण अधिकच वाढले आहे अशातच प्रत्येकाने आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे आवश्यक आहे.
या अशा वेळी असे सतर्क पोलीस निरीक्षक त्याठिकाणी असतीलच असे नाही. रमेश यांच्या सतर्कतेमुळे हे चोर पकडण्यासाठी मदत झाली व त्यामुळे आणखीन जणांना अटक करण्यात यश आले व त्यांच्याकडून अकरा मोबाईल जप्त करण्यात आले परंतु प्रत्येक वेळेला रमेश यांच्यासारखे सतर्क पोलिस ऑफिसर तिथे असतीलच असं नाही. म्हणून प्रत्येक नागरिकाने आपले स्वतःची व आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Viral video.