Home /News /national /

Crime News: फोन हिसकावून महिलेला बाईकवरुन 150 मीटरपर्यंत फरफटत नेलं, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

Crime News: फोन हिसकावून महिलेला बाईकवरुन 150 मीटरपर्यंत फरफटत नेलं, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

Caught on Camera, Woman drag 150 meters after mobile snatch: मोबाइल चोरटे एका महिलेला बाईकवरुन 150 मीटरपर्यंत फरफटत नेत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. दिल्लीतील शालिमार बाग परिसरातील ही घटना आहे.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर : दिल्लीतील शालिमार बाग परिसरात मोबाइल हिसकावण्याची (mobile snatching) घटना घडली आहे. चैन स्नॅचर्सने भरदिवसा एका महिलेचा फोन चोरला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत पीडित महिलेला चोरट्यांनी तब्बल 150 मीटरपर्यंत फरफटत सुद्धा नेलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (caught in CCTV) दिसून आला आहे. या घटनेमुळे सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्याचा दिल्ली पोलिसांचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे की, बाईकस्वार एका महिलेचा मोबाइल हिसकावून पळून जात आहेत. त्याचवेळी पीडित महिला त्यांच्या बाईकमागे फरफटत जाताना दिसत आहे. 150 मीटरपर्यंत फरफटत गेल्यानंतर ही महिला पडली. या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागिरकांनी पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दिल्लीतील शालिमार बाग परिसरात एका रुग्णालयात काम करते. ज्यावेळी ही घटना झाली त्यावेळी ती आपलं काम संपवून घराकडे जात होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत. वाचा : बेडवर गर्भवती महिलेचा मृतदेह तर शेजारी पतीचा गळफास, नव दाम्पत्याची हत्या की आत्महत्या? या घटनेबाबत नॉर्थ वेस्टचे डीसीपी म्हणाले, आरोपींनी महिलेचा मोबाइल हिसकावला. त्यानंतर या महिलेने आरोपींपैकी एकाचा जॅकेट पकडून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती दुचाकीसोबत फरफटत गेली. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी तपासासाठी आम्ही चार टीम बनवल्या आहेत. आमच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून आम्ही लवकरच आरोपींना अटक करु. 2021 या वर्षी दिल्लीत 47 स्नॅचिंगच्या घटना  घडल्या आहेत तर 357 दरोडेखोरांना फकडण्यात आले आहेत. त्यापैकी 89 जणांना शालिमार बाग पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली आहे. वाचा : चाकूनं भोसकून गर्लफ्रेंडनं केला Boyfriend चा खून, भयानक पद्धतीनं लावली मृतदेहाची विल्हेवाट चोरीसाठी घेतली रजा; औरंगाबादेतील तरुणाने 6 लाखांवर मारला डल्ला बीड शहरातील एका ऑटोमोबाईल्सच्या दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी मध्यरात्री दुकान फोडून 6 लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत या गुन्ह्याच्या छडा लावला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून तो एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपीनं चोरी करण्यासाठी कंपनीत रजा घेतली होती. रजा घेतल्यानंतर आरोपी औरंगाबादहून बीडमध्ये पोहोचला होता. याठिकाणी आरोपीनं आपल्या काही मित्रांच्या मदतीने ऑटोमोबाइल्सच्या दुकानावर डल्ला मारला होता. भामट्यांनी दुकानाची ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट लंपास केले होते.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cctv, Crime, Delhi

    पुढील बातम्या