News18 Lokmat

मोबाईल नंबर 10अंकीच राहणार, अफवांवर लक्ष देऊ नका

तुमचा मोबाईल नंबर लवकरच 13 अंकी होऊ शकतो. होय, सरकारचा यावर निर्णय जवळपास पक्का झालाय

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2018 04:33 PM IST

मोबाईल नंबर 10अंकीच राहणार, अफवांवर लक्ष देऊ नका

21 फेब्रुवारी : मोबाईलचा क्रमांक 13 अंकी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे अनेकजण आपला सध्याचा मोबाईल क्रमांक बदलल्यावर कसे होणार, या चिंतेत पडले होते. याविषयी स्पष्ट माहिती मिळत नसल्यामुळे काहीसा गोंधळही निर्माण झाला होता. मात्र, आता याबाबतचा गोंधळ दूर झाला असून सामान्य ग्राहकांचा मोबाईल क्रमांक 10 अंकी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दूरसंचार मंत्रालयाकडून काही दिवसांपूर्वी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये M2M (मशिन टू मशिन) मोबाईल नंबर 10 वरून 13 अंकी होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये आपल्या मोबाईलचा नंबरही बदलणार असा समाज पसरला होता. परंतु, सामान्य मोबाईल क्रमांक आणि M2M नंबर्समध्ये फरक असतो.  M2M मोबाईल नंबर हे स्वाईप मशिन्स, कार, वीजेची मीटर्स यांसारख्या उपकरणांसाठी वापरले जातात. त्यामुळे हा बदल सामान्य ग्राहकांसाठी नसेल असे भारती एअरटेल आणि जिओच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

बीएसएनएलच्या एजीएम महेंद्र सिंह म्हणाले, ' ग्राहकांनी 13 अंकी मोबाईल नंबर होईल, याची काळजी करू नका. सगळ्यांचे नंबर्स 10 अंकीच राहतील.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2018 02:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...