Home /News /national /

मोबाइल इंडिया चॅलेंज 2020 : गेमर्सनी तयारी लागा; 7 लाखांपर्यंत जिंकू शकता

मोबाइल इंडिया चॅलेंज 2020 : गेमर्सनी तयारी लागा; 7 लाखांपर्यंत जिंकू शकता

कॉल ऑफ ड्युटी मोबाईल स्पर्धेचं भारतीय गेमर्सनी मनापासून स्वागत केलं आहे.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : दक्षिण आशियाची एक अग्रगण्य इस्पोर्ट्स कंपनी नोडविन गेमिंगने कॉल ऑफ ड्यूटी (Call of duty) मोबाईल इंडिया चॅलेंज 2020 या पहिल्या कॉल ऑफ ड्यूटी : मोबाईल गेम स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी 20 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून आयोजकांनी 7,00,000 रुपयांहून अधिक किमतीची बक्षीसं ठेवली आहेत. या सामन्यांचं रेकॉर्डिंग नोडविनच्या यूट्यूब आणि फेसबुक हँडलवर थेट स्ट्रीम केलं जाईल, असं कंपनीने सांगितलंय. “मोबाईल इस्पोर्ट्सचं सध्या भारतात जोरदार वारं असल्यामुळे कॉल ऑफ ड्युटी: मोबाईल स्पर्धेचं भारतीय गेमर्सनी मनापासून स्वागत केलं आहे. कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल इंडिया चॅलेंजच्या साहाय्याने नोडविन गेमिंग कंपनीला या खेळासाठी भारतात एक वातावरण आणि गेमर्सची कम्युनिटी तयार करायची आहे,” असे कंपनीने त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे. नोडविनचे ​​एमडी आणि सह-संस्थापक अक्षत राठी म्हणाले की, गेमर्ससाठी स्वतःचे नाव सिद्ध करून प्रसिद्धी कमवण्यासाठी ही स्पर्धा व्यासपीठाची भूमिका बजावेल. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे नोंदणी करा आणि सहभागी व्हा. या स्पर्धेत 5v5चे एकूण 4 कप आणि बॅटल रॉयल मोड यावर एकत्रितपणे एकूण 6,48,000 रुपयांचा प्राइज पूल आहे. या दोन्ही मोडमधील विजेते 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या भव्य फिनालेमध्ये पोहोचतील. गेमर्स कॉल ऑफ ड्यूटीः मोबाईल गेमर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गेमर्सनी नोडविनच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी. हे ही वाचा-कृपया हे घरी करू नका, हा World Record आहे! तरुणाचा VIDEO पाहून तुम्हीही हादराल सर्वात लोकप्रिय बॅटल रॉयल गेम PUBG मोबाइल भारतात परत येण्यासंबंधी बातम्या येत असतानाच कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल इंडिया चॅलेंज 2020 स्पर्धा अशा वेळी जाहीर झाली आहे. PUBG मोबाईल विशेषत: भारतीय गेमरसाठी तयार केलेला गेम म्हणून परत येत आहे आणि ते ही एक नवीन नाव घेऊन, PUBG मोबाइल इंडिया. भारतीय गेमरसाठी PUBG मोबाइल इंडिया केव्हा बाजारात येईल, हे माहिती नाही, परंतु माहितीनुसार या वर्षाअखेरीपूर्वी तो येऊ शकतो. सध्या मोबाईल गेमिंग भारतात प्रचंड प्रसिद्ध आहे त्यामुळे ही स्पर्धाही लोकप्रिय होण्याची शक्यता आहे आणि मोबाईल गेमिंगसाठीचीही स्पर्धा यशस्वी झाली तर सर्वत्र त्यांच आयोजन होणं लवकरच सुरू होईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mobile

    पुढील बातम्या