लखनऊ, 01 फेब्रुवारी : सध्या आधुनिकतेच्या नावाखाली बहुतांश मुलं मोबाइल गेम्स, रील्स इत्यादींकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर, एके ठिकाणी आठ वर्षांची मुलं वेदपठण करून, त्याचं शिक्षण घेऊन सनातन धर्माचा झेंडा फडकता ठेवत आहेत. ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशमधली. प्रयागराजमधल्या दारागंज भागात चालवल्या जाणाऱ्या गुरुकुलमध्ये 300हून अधिक विद्यार्थी वेदांचं शिक्षण घेत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नियमित सरावामुळे ही मुलं खूप अवघड श्लोक सहजपणे म्हणत आहेत. हे गुरुकुल म्हणजेच श्री भारती तीर्थ वेद पाठशाळा.
श्री भारती तीर्थ वेद पाठशाळेचे माजी प्रमुख आचार्य डॉ. चिरंजीवी शर्मा यांनी सांगितलं की, ‘ही शाळा जवळपास 70 वर्षांपासून सुरू आहे. इथे मुलांना वेदशास्त्रांचे धडे दिले जातात.’ ते पुढे म्हणाले, की ‘आपण कितीही आधुनिक युगात आलो, तरीही आपल्याला हे सर्व जाणून घेण्यासाठी आपलं मूळ काय आहे ते स्वीकारावं लागेल आणि ते आपल्याला वेदातूनच कळेल.’
हे ही वाचा : पंचमुखी हनुमानाचं मंदिर तेही पाकिस्तानच्या कराचीत; मूर्तीचं आहे विशेष महत्त्व
असा असतो दिनक्रम
डॉ. चिरंजीवी म्हणाले की, ‘8 ते 12 वर्षं वयोगटातली मुलं आमच्या वेदपाठशाळेत आहेत. या सर्व मुलांचा दिनक्रम निश्चित असतो. या मुलांना पहाटे चार वाजता उठावं लागतं. त्यानंतर स्नान व नित्य विधी झाल्यावर आरती व कीर्तनात ही मुलं तल्लीन होतात. प्राचीन काळी मुलांना गुरुकुलात शिकवलं जाई, त्याच पद्धतीनं इथेही शिकवलं जातं. '
या मुलांना धोतर-कुर्ता हा वेश करावा लागतो आणि कपाळावर मोठा टिळा लावावा लागतो. डोक्यावर शेंडी ठेवणं आवश्यक आहे. या मुलांना दर महिन्याला मुंडण करावं लागतं. पाच वर्षं त्यांना गुरुकुल परंपरेत राहावं लागतं.'
जागतिक स्तरावरची शिक्षणव्यवस्था आज तंत्रज्ञानामुळे झपाट्यानं बदलतं आहे. विकसित देशात तर यामुळे आमूलाग्र बदल झाला आहे. दूरशिक्षण, स्वयंशिक्षण, होमस्कूलिंग अशा विविध स्वरूपात हे बदल परावर्तित होत आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला होता. या बदलत्या शिक्षण परिस्थितीमध्ये गुरुकुल पद्धती आजही टिकून असल्याचं प्रयागराज इथल्या श्री भारती तीर्थ वेद पाठशाळेवरून दिसत आहे.
हे ही वाचा : स्वप्नात या रंगाचे फूल दिसणे आहेत शुभसंकेत ! घरात येईल पैसा, सुख समृद्धी
एकीकडे स्मार्टफोनमध्ये अनेक शाळकरी मुलं गुरफटून जाताना दिसतात. मुलांना स्मार्टफोनवर गेम खेळण्यास आवडते. यामुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष झाल्याचीही चर्चा सुरू असते. त्यातच गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आजही असल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री भारती तीर्थ वेदपाठशाळा हे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile, Uttar pradesh, Uttar pradesh news