मराठी बातम्या /बातम्या /देश /तरुणाच्या मोबाईलचा स्फोट, अनं रेल्वेत उडाला गोंधळ VIDEO

तरुणाच्या मोबाईलचा स्फोट, अनं रेल्वेत उडाला गोंधळ VIDEO

मोबाईल ब्लास्टनंतर जखमी झालेला तरुण

मोबाईल ब्लास्टनंतर जखमी झालेला तरुण

रेल्वेत मोबाईलचा ब्लास्ट झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

  • Local18
  • Last Updated :
  • Munger, India

मुंगेर, 17 मार्च : बिहारमधील भागलपूरहून आनंद विहार टर्मिनलकडे जाणाऱ्या विक्रमशिला एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला आहे. प्रत्यक्षात एका प्रवाशाच्या बॅगेत ठेवलेल्या मोबाईलमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे दोन ते तीन महिला-पुरुष प्रवाशांच्या कपड्यांना आग लागली. त्याचवेळी एका युवकाच्या पँटला आग लागल्याने एक युवक जखमी झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे जखमी प्रवाशाला जमालपूर रेल्वे रुग्णालयात नेण्यात आले.

बॅगेतील मोबाईलचा स्फोट झाल्याने लागली आग -

जखमी रेल्वे प्रवाशाचे नाव संदीप कुमार राजकुमार प्रसाद (22) असे आहे. तो मुंगेर जिल्ह्यातील खरगपूर पोलीस स्टेशन अंतर्गत भालुआकोल येथील रहिवासी आहे. संदीप कुमार हा बरियारपूर येथील विक्रमशिला एक्स्प्रेसच्या एस-9 कोचमध्ये बसून जनरल तिकीट घेऊन आनंद विहारला जात होता.

मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुणाचा पाय भाजला -

दरम्यान, अचानक भागलपूरहून आनंद विहार टर्मिनलकडे जाणाऱ्या विक्रमशिला एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे मालदा विभागांतर्गत जमालपूर रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला. या घटनेत प्रवाशी संदीप कुमार जखमी झाला. यानंतर तत्काळ चेकिंग कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी ट्रेनमधील जखमी रेल्वे प्रवाशाची आग विझवली. तसेच त्याला ट्रेनमधून बाहेर काढले आणि तातडीने जमालपूर रेल्वे रुग्णालयात दाखल केले.

" isDesktop="true" id="851003" >

दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यानंतर संदीपने सांगितले की, त्याने मित्रांसोबत दिल्लीला जाण्यासाठी बरियारपूर स्टेशनवर आनंद बिहार विक्रमशिला एक्सप्रेस ट्रेन पकडली होती. त्याचवेळी जनरल बोगीतील गर्दीमुळे मित्रांसह स्लीपर कोचमध्ये गेला. तेवढ्यात जमालपूर स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी त्याच्या मित्राच्या बॅगेत आवाज आला आणि त्याच्या डाव्या पायाला धक्का लागला आणि त्याने घातलेल्या जीन्सला आग लागली.

संदीपने सांगितले की, मोबाईलच्या स्फोटानंतर त्यांना काहीच समजण्याआधीच जवळच्या सीटवर बसलेल्या दोन महिलांच्या साडीने पेट घेतला. मित्राने मोबाईल फोन बॅगेत ठेवला होता आणि त्याचा स्फोट झाला. त्याची बॅगही फाटलेली होती. काही समजेपर्यंत लोकांनी मला ट्रेनमधून उतरवले. त्यानंतर जमालपूर रेल्वे रुग्णालयात दाखल केले. मात्र, आग कशी लागली याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

First published:
top videos

    Tags: Bihar, Indian railway, Mobile, Railway