मराठी बातम्या /बातम्या /देश /धक्कादायक! चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, वृद्धासोबत घडलं भयानक

धक्कादायक! चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, वृद्धासोबत घडलं भयानक

file photo

file photo

मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना एक धक्कादायक प्रकार घडला.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India

    उज्जैन, 28 फेब्रुवारी : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्यानं एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. दयाराम बडोद (वय 60) असे मृत व्यक्तीचं नाव आहे. सोमवारी (27 फेब्रुवारी 2023) ही घटना मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये असलेल्या बडनगर तालुक्यातील रुनिजा रोडवरील शेतातील घरात घडलीय. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी नोंद करून पुढील तपास सुरू केलाय. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.

    मयत दयाराम बडोद हे रुनिजा रोडवरील शेतात एका खोलीत एकटेच राहत होते. सोमवारी त्यांच्या मोबाईलच्या स्फोट झाला, व त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत बडनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष मिश्रा यांनी सांगितलं की, ‘रुनिजा रोडवरील शेतामध्ये असणाऱ्या एका घरात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी जाऊन तपास केला असता, मोबाईलमुळे दयाराम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. मोबाईल चार्जिंगला लावल्यामुळे हा स्फोट झाल्याचे तपासात समोर आलंय.’

    ओप्पो कंपनीचा होता मोबाईल

    ज्या मोबाईलचा स्फोट झाला, तो ओप्पो कंपनीचा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी मृताच्या मानेपासून छातीपर्यंतचा भाग आणि एक हात पूर्णपणे निकामी झाल्याचं आढळून आलं. प्रथमदर्शनी तपासात स्फोट झाल्याचं समोर आलं. घटनास्थळी पाहणी केली असता, तेथे एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन हा जळालेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा पॉवर पॉइंट पूर्णपणे जळाला होता. घटनास्थळी इतर कोणतेही स्फोटक किंवा ज्वलनशील साहित्य आढळलं नाही, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

    चार्जिंग लावलेला असताना स्फोट

    मिळालेल्या माहितीनुसार मृत दयाराम यांच्या शेतातून विजेची हाय टेन्शन लाइन गेली होती. सोमवारी ते एका कार्यक्रमासाठी मित्र दिनेश चावडासोबत इंदूरला जाणार होते. दिनेशनं रेल्वे स्टेशनवर जाऊन दयाराम यांच्यासाठीही इंदूरचं तिकीट काढलं होतं. परंतु, दयाराम स्टेशनवर न आल्याने दिनेश यांनी त्यांना फोन केला. पण दयाराम यांनी फोन उचलताच तो बंद झाला.

    Instagram वरील ओळखीचं प्रेमात रुपांतर, 2 मुलांच्या आईचा धक्कादायक निर्णय...

    त्यानंतर दिनेश वारंवार दयाराम यांना फोन लावत होते, परंतु फोन बंद येत होता. अखेर दिनेश हे दयाराम यांना पाहण्यासाठी त्यांच्या शेतात पोहोचले, तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. तेथे दयाराम यांचा मृतदेह त्यांना दिसला. याबाबत त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

    पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, मोबाईलचा वापर आजकाल खूपच वाढला आहे. परंतु मोबाईल चार्जिंग करताना काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा हाच मोबाईल धोकादायक ठरू शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Death, Madhya pradesh, Mobile, Smartphone