मराठी बातम्या /बातम्या /देश /

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, अन् खाटीवर झोपलेल्या चिमुरडीचा...

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, अन् खाटीवर झोपलेल्या चिमुरडीचा...

हा स्फोट जेव्हा झाला तेव्हा चिमुरडी नेहाची आई कुसुम कश्यप खोलीत नव्हती.

हा स्फोट जेव्हा झाला तेव्हा चिमुरडी नेहाची आई कुसुम कश्यप खोलीत नव्हती.

हा स्फोट जेव्हा झाला तेव्हा चिमुरडी नेहाची आई कुसुम कश्यप खोलीत नव्हती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  News18 Desk

बरेली, 13 सप्टेंबर : मोबाईल चार्जिंगला लावल्यावर किंवा लॅपटॉप चार्जिंगला लावल्यावर स्फोट झाल्याच्या घडना घडल्याचे तुम्हाला माहित असेल. अशीच एक धक्कादायक घटना घडली, ज्यात एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला. चार्जिंग मोडवर ठेवलेल्या मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाला. यात एका 8 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण - 

ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेश राज्यातील बरेली जिल्ह्यातील फरीदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचोमी गावात घडली आहे. हा स्फोट जेव्हा झाला तेव्हा चिमुरडी नेहाची आई कुसुम कश्यप खोलीत नव्हती. स्फोटाचा मोठा आवाज ऐकून आईने खोलीकडे धाव घेतली असता मुलगी गंभीर भाजल्याचे तिला दिसले. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. फरिदपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरबीर सिंह यांनी न्यूज18 ला सांगितले की, याप्रकरणी अद्याप पोलिस स्टेशन किंवा चौकीत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पण हे अपघाताचे प्रकरण आहे.

मृत मुलीचे वडील सुनील कुमार कश्यपने सांगितले की, तो मोबाईल चार्जिंगला लावून काही कामासाठी बाहेर गेला होता. तर पत्नी कुसुम आणि दोन वर्षांची मुलगी नंदिनी आणि आठ महिन्यांची नेहा घरी होत्या. कुसुमने दोन्ही मुलींना स्वतंत्र खाटेवर झोपवून ती घरातील कामात व्यस्त होती. मात्र, यादरम्यान नेहाच्या खाटच्या वरती गच्चीवर लटकलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटामुळे खाटवर झोपलेली चिमुरडी नेहा गंभीररित्या भाजली.

हेही वाचा - ट्यूशनमधून आल्यानंतर 3 वर्षीय चिमुरडीची भयंकर अवस्था; खारघरमधील शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार

या दुर्घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलेत. मात्र, तिथे तिचा मृत्यू झाला. सुनीलने असेही सांगितले की, तो वीज नसलेल्या एका बांधकाम सुरू असलेल्या घरात राहतो. त्याचे कुटुंब, मोबाईल फोन लाइट आणि चार्ज करण्यासाठी सोलर प्लेट्स आणि बॅटरी वापरतात, अशी माहितीही त्याने दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Death, Mobile, Uttar pradesh