चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; मुलाचा मृत्यू

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; मुलाचा मृत्यू

Mobile Battery Blast : 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

  • Share this:

भोपाळ, 06 जून : मोबाईलच्या बॅटरी स्फोटात जखमी झाल्याचं किंवा मृत्यू झाल्याच्या घटना सतत घडताना दिसत आहेत. त्यामुळे हा मोबाईल जीवघेणा असं म्हणण्याची देखील वेळ येते. यापूर्वी देखील मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानं मुलांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये देखील अशीच घटना घडली आहे. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्यानं धार जिल्ह्यात12 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. कुटुंबानं देखील या घटनेला दुजोरा दिला आहे.

धार जिल्ह्यातील बडलीपाडा गावात 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला आणि लखनचा आपला जीव गमवावा लागला. मोबाईलमधून बॅटरी काढून ती खेकडा चार्जरच्या साहाय्यानं चार्जिंगला लावण्यात आली होती. त्यावेळी बॅटरीचा स्फोट झाला. त्यामध्ये 12 वर्षाच्या लखनचा मृत्यू झाला. त्यानंतर लखनला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

VIDEO : प्रकाश मेहता प्रकरणी धनंजय मुंडेंचं फडणवीसांवर टीकास्त्र

First published: June 6, 2019, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading