गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या शोरूमवर हल्लाबोल, संतप्त जमावाने केली माफीची मागणी

गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या शोरूमवर हल्लाबोल, संतप्त जमावाने केली माफीची मागणी

अशा काही वादाची आम्ही कल्पनाही केली नव्हती. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षीततेसाठी आम्ही ही जाहीरात मागे घेत आहोत असंही कंपनीने म्हटलं होतं.

  • Share this:

गांधीनगर 14 ऑक्टोबर: दागिण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘तनिष्क’च्या जाहीरातीचा वाद चिघळला आहे. गुजरात (Gujarat) मधल्या कच्‍छ जिल्ह्यातल्या गांधीधाममध्ये तनिष्‍क (Tanishq) च्या जाहिरातीवरून संतप्त जमावाने शोरूमवर हल्लाबोल केला. तनिष्क (Tanishq Advertisement) शोरूम च्या मॅनेजरला माफी मागायला भाग पाडलं. शेवटी मॅनेजरने माफीनामा लिहून तो बोर्डवर लावला तेव्हा कुठे जमाव परत गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

या जाहीरातीवरून वाद झाल्याने मंगळवारीच कंपनीने ही जाहीरात मागे घेतली हिती. या जाहीरातीत दोन वेगळ्या धर्मांचे कुटुंबीय दाखवण्यात आले होते. ही जाहीरात ही ‘लव्ह जिहाद’ला आणि बेगडी धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन देणारी आहे असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावरूनही त्या विरुद्ध कॅम्पेन चालवलं गेलं.

नंतर तनिष्क ने निवेदन प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली होती. आम्हाला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. या जाहीरातीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही खेद व्यक्त करतो असंही कंपनीने म्हटलं होतं. टाटांचा मोठा ब्रँड असलेल्या तनिष्कने दागिण्यांचा संग्रह ‘एकत्वम’साठी ही जाहीरात केली होती.

'होतं नव्हतं सगळं पावसानं नेलं'; हे PHOTOS पाहून डोळ्यात येतील अश्रू

अशा काही वादाची आम्ही कल्पनाही केली नव्हती. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षीततेसाठी आम्ही ही जाहीरात मागे घेत आहोत असंही कंपनीने म्हटलं होतं.

काय आहे जाहीरातीमध्ये?

तनिष्कच्या या जाहिरातीमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, हिंदू मुलीचं मुस्लीम मुलाशी लग्न झालेलं असतं. तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम सुरू असतो. मुस्लीम मुलाचं कुटुंब हिंदू पद्धतीप्रमाणे तिचं डोहाळेजेवण करतं. तेव्हा हिंदू मुलगी आपल्या सासूला विचारते की, "सासूबाई तुमच्या घरात ही परंपरा नाही. मग तुम्हीच हे का करत आहात.

...आणि एका क्षणात पुरात वाहून गेला तरुण, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

तेव्हा तिची सासू तिला उत्तर देते की, पण मुलीला खुश ठेवण्याची परंपरा प्रत्येक घरात असतेच ना". ही जाहिरात बघितल्यानंतर त्यावर लव्ह जिहादला (Love Jihad) पाठिंबा देणारी जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला. ट्विटरवर #BoyCottTanishq असा ट्रेंड सुरू झाला. त्यामुळे तनिष्कने हा व्हिडीओ यूट्यूब (Youtube)वरुन काढून टाकला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 14, 2020, 3:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading