'माझी सही खोटी', मॉब लिंचिंगबदद्ल मोदींना लिहिलेल्या पत्राबाबत मणिरत्नम यांचा खुलासा

देशात वाढलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना आणि जय श्रीराम घोषणेवरून पेटलेलं राजकारण याबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या 49 नामवंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. यामध्ये चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचाही समावेश होता. पण आता मात्र या पत्रावरची माझी सही खोटी आहे, असं मणिरत्नम यांनी म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 06:19 PM IST

'माझी सही खोटी', मॉब लिंचिंगबदद्ल मोदींना लिहिलेल्या पत्राबाबत मणिरत्नम यांचा खुलासा

नवी दिल्ली, 24 जुलै : देशात वाढलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना आणि जय श्रीराम घोषणेवरून पेटलेलं राजकारण याबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या 49 नामवंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. यामध्ये चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचाही समावेश होता. पण आता मात्र या पत्रावरची माझी सही खोटी आहे, असं मणिरत्नम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या पत्राबदद्लच वाद निर्माण झाला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, मणिरत्नम सध्या त्यांच्या पुढच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यांनी अशा कोणत्याही पत्रावर सही केलेली नाही. तसंच त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी असं कोणतंही पत्र आलेलं नाही.

पंतप्रधानांना पत्रं लिहिलेल्या व्यक्तींमध्ये अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, रामचंद्र गुहा, शुभा मुद्गल, अपर्णा सेन अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांचा समावेश आहे. या सगळ्यांनी समाजामध्ये वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे.

पाहा VIDEO : राज्यसभेत हमसून हमसून रडू लागले खासदार

या पत्रात ते म्हणतात, सध्या धर्म आणि जात-पात याच्याशी जोडलेल्या घटना घडत आहेत. मॉब लिंचिंगच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पंतप्रधान या नात्याने तुम्ही मॉब लिंचिंगच्या घटनांवर संसदेत भाष्य केलं आहे पण ते पुरेसं नाही. या घटना रोखायच्या असतील तर याबद्दल कडक कायदे बनवावे लागतील.

Loading...

जय श्रीराम च्या घोषणांवरून अनेक ठिकाणी उघडउघड संघर्ष उफाळून येत आहे. लोकांना त्यांच्याच देशात राष्ट्रविरोधी किंवा अर्बन नक्षल म्हटलं जात आहे. भारतासारख्या लोकशाही देशात अशा घटना रोखणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एखादा मुद्दा सरकारच्या विरोधात असेल तर तो उपस्थित करणाऱ्याला राष्ट्रविरोधी मानलं जाऊ नये, असंही या पत्रात म्हटलं आहे.

===============================================================================================

SPECIAL REPORT: फुशारकी मारणाऱ्या अमेरिकेवर माफी मागण्याची नामुष्की

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 06:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...