आसाममध्ये आई आणि मुलाची जमावानं केली ठेचून हत्या

आसाममध्ये आई आणि मुलाची जमावानं केली ठेचून हत्या

Mob Lynching : आसाममध्ये संतापलेल्या जमावानं केलेल्या मारहाणीत आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

तिनसुकिया, 08 जून : देशात घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. यापूर्वी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात देखील अशा घटना घडलेल्या आहेत. त्यानंतर आता आसाममध्ये देखील मॉब लिंचिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिनसुकिया जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळी एका महिलेचा मृतदेह सापडला. त्यानंतर भडकलेल्या जमावानं महिला आणि तिच्या मुलाची ठेचून हत्या केली आहे. घटनास्थळी पोलिस हजर होते. पण, त्यांनी जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.

काय आहे सारा प्रकार

आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यामधील रंगपूरी येथील महिला दोन महिन्यापासून तिच्या 2 महिन्याच्या मुलासह बेपत्ता होती. महिलेच्या सासरचे तिचा छळ करत होते असा आरोप महिलेच्या माहेरच्या लोकांनी केला. अखेर महिलेचा मृतदेह शौचालयाच्या टीकाजवळून ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर नाराज आणि भडकलेल्या नातेवाईकांनी स्थानिकांची मदत घेत मृत महिलेच्या सासरच्या घरावर हल्ला केला. लोकांचा राग प्रचंड होता. त्यांनी घरातील काही माणसांना लाठी – काठीनं मारहाण सुरू केली.

यावेळी मृत्यू होईपर्यंत दोघांना मारहाण करण्यात आली. घटना घडत असताना पोलिसांना माहिती दिली गेली. पण, लोकांचा राग पाहता पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप करणं टाळलं. काही काळानंतर जखमींना रूग्णालयात हवलण्यात आलं होतं. पण, त्यावेळी आई आणि मुलाचा मृत्यू झाला होता.

SPECIAL REPORT: वसईतील 'या' भन्नाट रिक्षाची का होते आहे चर्चा?

First published: June 8, 2019, 4:14 PM IST

ताज्या बातम्या