मॉब लिंचिंग आणि 'जय श्रीराम' याबदद्ल 49 सेलिब्रेटींचं मोदींना पत्र

मॉब लिंचिंग आणि 'जय श्रीराम' याबदद्ल 49 सेलिब्रेटींचं मोदींना पत्र

देशभरातल्या वेगवेगळ्या भागात मॉब लिंचिंगच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर जय श्रीराम च्या घोषणांवरूनही राजकारण पेटलं आहे. या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत देशभरातल्या 49 नामवंत व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जुलै : देशभरातल्या वेगवेगळ्या भागात मॉब लिंचिंगच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर जय श्रीराम च्या घोषणांवरूनही राजकारण पेटलं आहे. या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत देशभरातल्या 49 नामवंत व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

या व्यक्तींमध्ये अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, रामचंद्र गुहा, शुभा मुद्गल, अपर्णा सेन अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींचा यात समावेश आहे. या सगळ्यांनी समाजामध्ये वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे.

या पत्रात ते म्हणतात, सध्या धर्म आणि जात-पात याच्याशी जोडलेल्या घटना घडत आहेत. मॉब लिंचिंगच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पंतप्रधान या नात्याने तुम्ही मॉब लिंचिंगच्या घटनांवर संसदेत भाष्य केलं आहे पण ते पुरेसं नाही. या घटना रोखायच्या असतील तर याबद्दल कडक कायदे बनवावे लागतील.

'जय श्रीराम'चा उल्लेख

जय श्रीराम च्या घोषणांवरून अनेक ठिकाणी उघडउघड संघर्ष उफाळून येत आहे. लोकांना त्यांच्याच देशात राष्ट्रविरोधी किंवा अर्बन नक्षल म्हटलं जात आहे. भारतासारख्या लोकशाही देशात अशा घटना रोखणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एखादा मुद्दा सरकारच्या विरोधात असेल तर तो उपस्थित करणाऱ्याला राष्ट्रविरोधी मानलं जाऊ नये, असंही या पत्रात म्हटलं आहे.

अनुराग कश्यप यांच्या मुलीला केलं ट्रोल

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलियाला मुलीला सोशल मीडियावर अभद्र भाषेत ट्रोल करण्यात आलं होतं. तिला धमक्या देणारे ट्वीटही केले गेले. तू तुझ्या वडिलांना सांग की भाजपच्या विरुद्ध काही लिहू नका, असे मेसेज तिला पाठवले जात होते.

तब्बल 11 वर्षांनी महेश मांजरेकर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना देणार ‘धक्का’

यावर अनुराग कश्यप यांना एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करतो. पण मी त्यांची विचारधारा आणि प्रत्येक मु्द्याशी सहमत नाही. मला ज्या गोष्टीबद्दल आवाज उठवावासा वाटतो तिथे मी उठवतोच. याबदद्ल लोक मला ट्विटरवर ट्रोल करत असतात. मला जीवे मारण्याचीही धमकी दिली जाते. मी अशा धमक्यांना घाबरत नाही पण माझ्यामुळे माझ्या कुटुंबीयांवर हल्ले होणार असतील तर मात्र मला भीती वाटते.

या घटनेनंतर अनुराग कश्यप यांच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या सहाकाऱ्यांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. हा एफआयआर दाखल करण्यासाठी अनुराग कश्यप यांना पोलीस स्टेशनला चकरा माराव्या लागल्या. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट केल्यानंतरच पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली होती. तरीही त्यांच्या मुलीला धमक्या देणाऱ्यांचा शोध अजूनही लागलेला नाही.

======================================================================================================

VIDEO: दहशत पसरवण्यासाठी भरदिवसा नेमबाजाला तीन तरुणांची बेदम मारहाण

Published by: Arti Kulkarni
First published: July 24, 2019, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading