बनियापूर, 20 जुलै: बिहारमध्ये जनावरं चोरीच्या संशयातून तिघांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. मॉब लिंचिंगच्या या घटनेमुळं मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा सुशासनाचा दावा किती फोल आहे हे पुन्हा एकदा उघड झालं आहे. गुरुवारी रात्री जनावरे चोरीच्या संशयातून गावकऱ्यांनी चौघांना पकडलं होतं. त्यापैकी एकजण जमावाच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाल्यामुळं बचावला. मात्र उरलेल्या तिघांना जमावानं लाठ्याकाठ्यानं बेदम मारहाण केली. त्यापैकी दोघांनी घटनास्थळावरचं प्राण सोडला तर तिसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.