घर मे घुंस गये वो लोग.... मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या मुस्लीम कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल; जमावाने केली अमानुष मारहाण

घर मे घुंस गये वो लोग.... मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या मुस्लीम कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल; जमावाने केली अमानुष मारहाण

10-12 तरुणांच्या जमावाने एका मुस्लीम कुटुंबाच्या घरात घुसून बेदरकारपणे लाठ्या- काठ्यांनी मारहाण करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:

गुरुग्राम, 23 मार्च : होळीच्या दिवशी किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या भांडणाचा शेवट अमानुष मारहाणीत झाला. 10-12 पुरुषांचा जमाव एका मुस्लीम कुटुंबाच्या घरात घुसून बेदरकारपणे लाठ्या- काठ्यांनी फोडून काढत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  हरियाणातल्या गुरुग्राममधला हा व्हिडिओ असून पीडित मुस्लीम कुटुंबातल्या स्त्रिया मदतीची याचना करत असतानाचं यात स्पष्ट दिसत आहे.

हरयाणा पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. सहा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुग्राम मारहाण प्रकरण आता चांगलंच गाजलंच पेट घेत आहे. अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, रणदीपसिंग सुरजेवाला, अशोक गेहलोत अशा अनेक विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध करत सत्तारुढ भाजप सरकारला यासाठी जबाबदार धरलं आहे.

होळीच्या दिवशी किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये भांडण सुरू झालं, असं पोलीस म्हणत असले तरी पीडित कुटुंबातील व्यक्तींनी मात्र आम्हाला ठरवून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. हिंदुत्ववादी संघटना या टोळक्याच्या पाठिशी असल्याचा त्यांचा आरोप आहे.
सुमारे दहा जणांच्या टोळक्याने काठ्या आणि रॉडच्या साहाय्याने या कुटुंबातील पुरुषांना अमानुषपणे मारहाण केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. एकाचं डोकं रक्तबंबाळ झाल्यानंतरही त्याच्यावर काठीने वार करण्यात आले. बेशुद्ध होईपर्यंत मारहाण झाल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

या व्हिडिओवरून आता राजकारणही पेटणार अशी चिन्हं आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हा व्हिडिओ ट्वीट करत हिटलरच्या सत्तेची तुलना केली आहे. मोदी सत्तेसाठी हे करत असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनीसुद्धा या मारहाणीच्या व्हिडिओची दखल घेत निषेध केला आहे. खट्टर सरकार म्हणजे जंगल राज असल्याची टीका केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही याविषयी निषेध करण्यात आला आहे आणि हरयाणा सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे.
मुस्लीम कुटुंबाला मारहाण करण्यासाठी सुमारे 40 जणांचा जमाव आल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पाकिस्तान चले जाव असे नारे देत जमाव अमानुषपणे मारहाण करत सुटला होता, असं काही माध्यमांनी वृत्त दिलं आहे. अशा प्रकारे जातीय विद्वेष पसरवून काय मिळतं असं म्हणत समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी याचा निषेध केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या