VIDEO : शबरीमलामध्ये न्यूज18 च्या महिला पत्रकारावर हल्ला

VIDEO : शबरीमलामध्ये न्यूज18 च्या महिला पत्रकारावर हल्ला

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज संध्याकाळी मासिक पुजेसाठी हे मंदिर प्रथमच उघडलं जाणार आहे.

  • Share this:

17 आॅक्टोबर : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज संध्याकाळी मासिक पुजेसाठी हे मंदिर प्रथमच उघडलं जाणार आहे. मात्र मंगळवारी अय्यप्पाच्या भाविक महिलांनी शबरीमला मंदिराकडे निघालेल्या १० ते ५० वर्षे वयोगटातील मुली आणि महिलांना रोखल्यानं तणावाची स्थिती निर्माण झालीये.

शबरीमलामध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी गेलेल्या न्यूज 18 नेटवर्कच्या रिपोर्टर राधिका रामास्वामी यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली.

आंदोलक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी राधिका रामास्वामी यांना कारमधून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला.

आंदोलकांनी कॅमेरा आणि इतर साहित्यांची तोडफोड केली.

घटनास्थळी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थितीत होते. आम्ही त्यांना मदतीसाठी मागणी केली पण पोलीस गर्दीला रोखू शकले नाही. आम्ही इथून परत जातो असं सांगितल्यावरही आंदोलकांनी गाडीवर हल्ला केला असं राधिका रामास्वामी यांनी सांगितलं.

केरळचे डीजीपी लोकनाथ बेहरा यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली असून आरोपींनी कुठल्याही परिस्थितीत सोडण्यात येणार नाही असं आश्वासन दिलंय.

दरम्यान, न्यूज मिंट आणि रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांवरही हल्ला झालाय. न्यूज मिंटचे पत्रकार हे राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करत होते. या बसमध्ये २० भाविक होते. पम्बाजवळ आंदोलकांनी बसला घेराव घालून दगडफेक केली.

तर रिपब्लिक टीव्हीच्या प्रतिनिधी पूजा प्रसन्ना यांच्या कारवर जवळपास १०० लोकांच्या जमावे हल्ला केलाय.

==================================

First published: October 17, 2018, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading