मराठी बातम्या /बातम्या /देश /

MNS in Ayodhya: 'मराठी माणसाचा स्वाभिमान जपला, आम्हाला चॅलेंज करायचं नाही' म्हणत मनसैनिक अयोध्येत दाखल, पाहा VIDEO

MNS in Ayodhya: 'मराठी माणसाचा स्वाभिमान जपला, आम्हाला चॅलेंज करायचं नाही' म्हणत मनसैनिक अयोध्येत दाखल, पाहा VIDEO

 'मराठी माणसाचा स्वाभिमान जपला, आम्हाला चॅलेंज करायचं नाही' म्हणत मनसैनिक अयोध्येत दाखल, पाहा VIDEO

'मराठी माणसाचा स्वाभिमान जपला, आम्हाला चॅलेंज करायचं नाही' म्हणत मनसैनिक अयोध्येत दाखल, पाहा VIDEO

MNS leaders in Ayodhya: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झालेला असला तरी मनसेचे नेते आणि कार्यकर्ते अयोध्येत दाखल झाले आहेत.

  • Published by:  Sunil Desale

अयोध्या, 5 जून : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आणि त्यानुसार मनसे नेते, कार्यकर्त्यांनी या दौऱ्याची तयारी सुरू केली. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंना आपला अयोध्या दौरा तुर्तास स्थगित (Raj Thackeray postponed Ayodhya tour) करावा लागला. पण असे असले तरी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी ठरलेल्या तारखेला म्हणजेच 5 जूनचा मुहूर्त चुकवला नाही आणि अयोध्येत दाखल झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना तेथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला. इतकेच नाही तर जोपर्यंत उत्तरभारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशाराच बृजभूषण सिंह यांनी दिला होता. राज ठाकरेंनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव आणि होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे आपला दौरा स्थगित केला. पण मनसैनिकांनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधाला न जुमानता अयोध्येत दाखल झाले आहेत.

ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (MNS leader Avinash Jadhav) हे मनसेच्या कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत दाखल झालेल्या अविनाश जाधव यांनी तेथून एक व्हिडीओ सुद्धा शूट करुन आपल्या फेसबूकवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अविनाश जाधव यांनी म्हटलं, "आजची तारीख पाच जून... सन्माननीय श्री राजसाहेब यांचा अयोध्या दौरा होता काही कारणास्तव तो रद्द झाला पण त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो पूर्ण केला मराठी माणसाचा स्वाभिमान जपला".

अविनाश जाधव याांनी म्हटलं, "मी अविनाश जाधव मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष... मी आत्ता आहे अयोध्येत. राम जन्मभूमीत आम्ही दाखल झालो आहोत. रामलल्लाचं दर्शन प्रत्येक हिंदूनने घेतलं पाहिजे. आज मी इथे आलो आहे. मी प्रत्येक मराठी बांधवांना विनंती करतो की तुम्ही अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनाला या. आज 5 तारीख आहे आणि एक मराठी माणूस अयोध्येत आला आणि त्याने श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे."

अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक सापळा

22 मे रोजी पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं, अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला, अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला. अनेकजण गुपचूप बोलू लागले. मी मुद्दाम मध्ये दोन दिवस घेतले. की काय बोलायचं ते बोलून घ्या एकदाचं. मग माझी भूमिका महाराष्ट्र, देशाला सांगेल असं म्हटलं. ज्या दिवशी मी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली आणि त्यानंतर अयोध्येला जाणार याच्या तारखेची घोषणा पुण्यात केली. त्यानंतर काही दिवसातच हे सर्व प्रकरण सुरू झालं. की, अयोध्येला जाणार नाही. मग ते प्रकरण सर्व वाढू लागलं. मी सर्व पाहत होतो की काय सुरू आहे. मला मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेशातून काही गोष्टींची माहिती मिळत होती की नेमकं काय चाललं आहे. एक वेळ आली आणि माझ्या लक्षात आलं की, हा एक ट्रॅप आहे, हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे. ही सर्व गोष्टींची सुरुवात झाली त्याची रसद पुरवली गेली त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. की या सर्व गोष्टी पुन्हा बाहेर काढा. ज्यांना-ज्यांना माझी अयोध्यावारी खूपली असे अनेकजण होते. त्या सर्वांनी सर्वगोष्टी मिळून सर्व आराखडा आखला. मी एकाच गोष्टीचा विचार केला.. मी खरंतर अयोध्येला जाणार. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं हे आलंच.

First published:

Tags: Ayodhya, MNS, Raj Thackeray