पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं म्हणून राज ठाकरेंना EDकडून नोटीस, मनसेचा थेट आरोप

राज ठाकरेंचा तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर मनसे याला भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 08:05 AM IST

पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं म्हणून राज ठाकरेंना EDकडून नोटीस, मनसेचा थेट आरोप

मुंबई, 19 ऑगस्ट  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ED) नोटीस बजावली आहे. येत्या 22 ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही नोटीस बजावण्यात आल्यानं राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

मनसेचे मोदी सरकारवर आरोप  

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या विरोधात प्रचार केला होता. मोदींविरोधात जोरदार आवाज उठवण्यात आल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आल्याचा थेट आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे. मनसे अशा नोटीशींना भीक घालत नाही. सरकार आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला. 'कोहिनूर मिलचं प्रकरण अतिशय जुनं आहे. इतकी वर्ष झाल्यानंतर सरकारला आताच  का जाग आली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच राज ठाकरे यांच्यावर कारवाई झाल्यास आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारादेखील देण्यात आला आहे.

(वाचा : 'जागतिक पातळीवर पाकिस्तानचे तोंड काळेच झाले')

नेमके काय आहे कोहिनूर प्रकरण?

Loading...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेतलं. मात्र यात आयएलएफएसचे मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली. यानंतर 2008मध्ये राज ठाकरे यांनी यातील आपले सर्व शेअर्स विकले. पण त्यानंतरही राज ठाकरे यांचा संबंधित कंपनीत सक्रिय सहभाग असल्याचं सांगत ईडीकडून चौकशी सुरू आहे.

(वाचा : काँग्रेसनं मुस्लिमांचं तुष्टीकरण आणि देशाचं वाटोळं केलं - शहा)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे ईडीच्या निशाण्यावर असल्याच्या बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर 2 ऑगस्ट रोजी त्यांना पत्रकारांनी प्रश्न देखील विचारले होते. त्यावर ते म्हणाले होते की, 'मला कोणीही हॅलो करण्यासाठी आलेलं नाही. मी याबद्दल फक्त तुमच्याकडून बातम्या ऐकत आहे.'

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज यांना नोटीस मिळाल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे. येत्या 21 ऑगस्टला मुंबईत EVM विरोधात सर्व पक्षीय मोर्चा आहे. त्यासाठी खुद्द राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानंतर एक दिवसांनी राज यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावं लागणार आहे.

(वाचा : बाबरचे वंशज देणार राम मंदिरासाठी सोन्याची वीट!)

Zomato महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ केल्याचा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 08:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...