आम्ही 'शहांचे' सैनिक वेडे; 'शिवसेना गीता'च्या आधारे मनसेचा उद्धव ठाकरेंवर 'निशाणा'

आम्ही 'शहांचे' सैनिक वेडे; 'शिवसेना गीता'च्या आधारे मनसेचा उद्धव ठाकरेंवर 'निशाणा'

उद्धव ठाकरे गांधी नगरला गेल्यानंतर आता मनसेनं त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता गांधीनगरला गेले. त्यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना गीताचा आधार घेत निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये संदीप देशपांडे यांनी आम्ही “शहाचे” सैनिक वेडे करुन जिवाचे रान, चाललो आम्ही गुजरातला भरायला “अफजलखानाचा” फॉर्म अशी उपरोधिक टीका केली आहे. सत्तेत असून देखील शिवसेना - भाजपनं संधी मिळेल त्या ठिकाणी परस्परांवर निशाणा साधला होता. अगदी युती तोडण्याची भाषा करत शिवसेनेनं तसा ठराव देखील संमत केला होता. पण, लोकसभा आणि विधानसभेकरता आता दोन्ही पक्षांनी सर्व वाद बाजुला सारत युती केली. दरम्यान, अमित शहा गांधीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरायला उद्धव ठाकरे, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांनी हजेरी लावली होती.

भाषणात काय म्हणाले उद्धव ठाकरे?

''जसं आम्ही सर्वजण आज एकत्र आलो. तसंच तुम्हीसुद्धा एकत्र येऊन दाखवा आणि एक मुखानं सांगा कोण बनेल तुमचा पंतप्रधान? आम्हाला सत्ता जरूर हवी आहे, पण आम्ही खुर्चीसाठी पागल झालेलो नाहीत.'' असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच ''आमच्यामध्ये मतभेद नक्की होते. मात्र, आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मनाने एक झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकच असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत,'' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरचे भाजपचे उमेदवार अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या.

VIDEO: 'सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय इंदिरा गांधी घेऊ शकतात, तर मोदी का नाही?'

First published: March 30, 2019, 3:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading