मराठी बातम्या /बातम्या /देश /

आमदाराच्या घोरण्यामुळे विधानसभेची शांतता भंग; मुख्यमंत्रीही वळून पाहू लागले हा प्रकार

आमदाराच्या घोरण्यामुळे विधानसभेची शांतता भंग; मुख्यमंत्रीही वळून पाहू लागले हा प्रकार

MLAs snoring in Legislative Assembly : आमदारांच्या घोरण्याचा आवाज इतका दमदार होता की सर्वजण आवाजाच्या दिशेने पाहू लागले.

MLAs snoring in Legislative Assembly : आमदारांच्या घोरण्याचा आवाज इतका दमदार होता की सर्वजण आवाजाच्या दिशेने पाहू लागले.

MLAs snoring in Legislative Assembly : आमदारांच्या घोरण्याचा आवाज इतका दमदार होता की सर्वजण आवाजाच्या दिशेने पाहू लागले.

  • Published by:  Meenal Gangurde

MLAs snoring in Legislative Assembly : रांची, 1 मार्च : झारखंड विधानसभेच्या (Jharkhand Assembly) अर्थसंकल्पीय बजेटची (Budget Session) मोठी चर्चा सुरू आहे.  या राजकीय चर्चांमध्ये काही मजेशीर गोष्टीही समोर आल्या आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारनंतर विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रत्येक पक्षाचे आमदार आपलं म्हणणं व्यक्त करीत होते. अपक्ष आमदार सरयू राय विधानसभेत आपलं म्हणणं मांडत होतं. सरयू राय जेव्हा बोलत होते, तेव्हा सभेत शांततेची अपेक्षा ठेवू शकतो. विशेषत: जेव्हा विरोधकांनी सभेवर बहिष्कार केलेला होता. अर्थात तेव्हा अशीच काहीशी परिस्थिती होती. नेमकं त्याच वेळी सरयू राय यांच्या भाषणादरम्यान घोरण्याच्या आवाज ऐकू येत होता. घोरण्याचा आवाज इतका मोठा होता की, सर्वजण त्या दिशेने पाहू लागले. मुख्यमंत्री हेमंत सोरेनदेखील मागे वळले आणि त्यानंतर आमदारांना झोपेतून उठवण्यात आलं.

यंदा झारखंड विधानसभेत पिवळ्या पगडीचा जलवा पाहायला मिळाला.(MLAs snoring disturbed the peace of the Legislative Assembly)

हे ही वाचा-लोकप्रतिनिधींनाच नाही कोरोनाचं गांभीर्य! अधिवेशनात आमदारांची विनामास्क एन्ट्री

सभेत काँग्रेस आमदार इरफान अंसारी पिवळ्या रंगाची पगडी घालून पोहोचले होते. इरफान अंसारीची टोपी सर्वात आधी त्यांचे मित्र भाजप आमदार रणधीर सिंह यांनी घेतली. सभेमध्ये विरोध असतानाही रणधीर सिंह यांनी तिच टोपी घातली होती. वेलमध्ये रणधीर सिंह पिवळी टोपी घालूनच सरकार आणि इरफान अंसारींच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. (MLAs snoring disturbed the peace of the Legislative Assembly)

काही दिवसांपूर्वी झारखंड अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत आणखी एक बातमी आली होती. यावेळी अनेक आमदार देशातून कोरोना गेल्या प्रमाणे मास्क न घालताच विधानसभेत पोहोचले होते. कोरोनाची परिस्थिती पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. आमदार मात्र या महासाथीकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक आमदार सहभागी होण्यासाठी मास्क न लावताच पोहोचले. यावर त्यांना सवाल केला असता ते विविध उत्तरं देऊ लागले. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाही अनेकजणं मास्क लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

First published:

Tags: Assembly session, Jharkhand, Mla