'आमदाराने अनेक वेळा केला बलात्कार, व्हिडीओ कॉलवर न्यूड...'; पीडितेचा धक्कादायक आरोप

'आमदाराने अनेक वेळा केला बलात्कार, व्हिडीओ कॉलवर न्यूड...'; पीडितेचा धक्कादायक आरोप

अनेक मुलींसोबत दुष्कृत्य केल्याचा या आमदारावर आरोप आहे

  • Share this:

लखनऊ, 19 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) बाहुबली आमदार विजय मिश्रा (MLA Vijay Mishra) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. भदोहीच्या ज्ञानपुरा येथे एमएलए विजय मिश्रा तुरुंगात आहेत. यादरम्यान बलात्काराचा आरोप लावणाऱ्या पीडित तरुणीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक आरोप केले आहेत. पीड़ितेचा आरोप आहे की आमदाराने प्रयागराज आणि वाराणसीमध्येही तिच्यावर बलात्कार (Rape) केला होता. वाराणसीतील या गायिकेने आमदार विजय मिश्रा यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

स्वत: विवस्त्र व्हायचे आणि मलाही सांगायचे

यावेळी पीडितेने आमदार विजय मिश्रा यांच्यावर अनेक आरोप केले. पीडितेने सांगितले की, आमदार विजय मिश्रा 2014 मध्ये बलात्कारानंतर सातत्याने त्यांना व्हिडीओ कॉलवर न्यूड होण्यासाठी जबरदस्ती करत होते. इतकच नाही तर पीडितेला जीवे मारण्याची धमकीही देत होते. पीडितेने सांगितले की, यादरम्यान आमदार विजय मिश्रा स्वत: न्यूड होत आणि व्हिडीओ कॉलवर पीडितेला न्यूड व्हायला सांगत.

हे ही वाचा-जळगाव हत्याकांड! आरोपींकडून गुन्हा कबूल, समोर आली डोकं सून्न करणारी माहिती

अनेकांना दिला त्रास

एनबीटी ऑनलाइन के कैमरे पर पीड़िता पुढे म्हणाली की, तिच्याप्रमाणेच अनेक मुलींसोबत एमएलएने दुष्कृत्य केलं आहे. मात्र त्यांच्या पदामुळे कोणीही समोर येऊन त्यांची तक्रार केली नाही. पीडितेने सांगितले की, मीदेखील याच भीतीने इतके दिवस शांत होते. मात्र आज ते तुरुंगात गेल्यानंतर मी हिम्मत करून पुढे आले आहे. आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडिता म्हणाली की, सर्व मुलींना आवाज उठवायला हवा. अशा राक्षसाचा नाश व्हायला हवा.

प्रयागराज-वाराणसीमध्येही बलात्काराचा आरोप

एनबीटी ऑनलाइनने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान पीडितेने सांगितले की, भदोहीशिवाय प्रयागराज आणि वाराणसीतील एका हॉटेलमध्ये विजय मिश्रा याने बलात्कार केला होता. पीडिता म्हणाली की, विजय मिश्रा यांचे फोन उचलले नाही तर ते माझ्या घरी यायचे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 19, 2020, 6:00 PM IST

ताज्या बातम्या