बंदूक घेऊन धमकावणाऱ्या 'चॅम्पियन' आमदाराची भाजपने केली हकालपट्टी

बंदूक घेऊन धमकावणाऱ्या 'चॅम्पियन' आमदाराची भाजपने केली हकालपट्टी

त्यांच्यावर टीकेची बातमी देणाऱ्या एका पत्रकाराला राजधानी दिल्लीत बंदूक दाखवून धमकावलं होतं. सोशल मीडियातून 'चॅम्पियन' यांचे प्रताप बाहेर येऊ लागल्याने भाजपवर टीका झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 17 जुलै : उत्तराखंडमधील भाजपचे आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. 'चॅम्पियन' यांचा बंदूक घेऊन नाचतानाचा व्हिडिओ वायरल झाला होता. दारु पिऊन बंदुकीसह त्यांनी नाच केला होता. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर टीकेची बातमी देणाऱ्या एका पत्रकाराला राजधानी दिल्लीत बंदूक दाखवून धमकावलं होतं. सोशल मीडियातून 'चॅम्पियन' यांचे प्रताप बाहेर येऊ लागल्याने भाजपवर टीका झाली होती. त्यामुळे पक्षाने पहिले त्यांना निलंबित केलं होतं. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

कुलभूषण जाधव यांचा जीव वाचू शकतो पण पाकिस्तानातून सुटका नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल

आमदारांच्या वाढत्या बेशिस्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली होती. 2 जुलै रोजी झालेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांनी अशा नेत्यांना तंबी दिली होती. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आणि इंदुरचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी पालिका अधिकाऱ्याला बॅटने केलेल्या मारहाणीमुळेही वाद झाला होता.

महाराष्ट्रातल्या धरणफुटीची नरेंद्र मोदींनी घेतली दखल, हा घेतला मोठा निर्णय

त्याची  दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. भाजपच्या संसदीय गटाची बैठकीत बोलताना नरेंद्र मोदी यांनी कुणाचाही मुलगा असला तरी अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, अशा शब्दात कानउघडणी केली होती. तसंच असा प्रकार पुन्हा होता कामा नये. ही बाब पक्षाच्या आणि देशाच्या हिताची नसल्याचं म्हणत आकाश विजयवर्गीय प्रकरणात आपली भूमिका केली होती.

#Sareetwitter प्रियांका गांधींनी शेअर केला 22 वर्षं जुना साडीतला फोटो

काय आहे प्रकरण

26 जून रोजी पालिकेचे अधिकारी जुनं बांधकाम पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी तिथे आकाश विजयवर्गीय देखील दाखल झाले. त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना कारवाईपासून रोखलं. पण, त्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. त्याचा राग आल्यानं आकाश विजयवर्गीय यांनी पालिका अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केली होती. त्यामध्ये पालिका अधिकारी जखमी झाला. या अधिकाऱ्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

First published: July 17, 2019, 6:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading