हरियाणाचे CM ठरले, आज दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हरियाणाचे CM ठरले, आज दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

मनोहर लाल खट्टर यांना शनिवारी एकमताने भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले.

  • Share this:

चंदीगड, 27 ऑक्टोबर : आज हरियाणामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे. मनोहर लाल खट्टर हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. जननायक जनता पार्टी (जेजेपी) नेते दुष्यंत चौटाला हे राज्याचे उपमुख्यमंत्री होतील. शपथविधी सोहळा दुपारी अडीच वाजता चंदीगडच्या राजभवनात पार पडणार आहे.

खट्टर यांची विधानसभेचे नेते म्हणून निवड

मनोहर लाल खट्टर यांना शनिवारी एकमताने भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले. खट्टर यांचे नाव आमदार अनिल विज यांनी प्रस्तावित केले होते, तर कुंवर पाल आणि अन्य भाजपच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शविला होता. विधानसभेचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर खट्टर यांनी हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी दावा सादर केला.

हरियाणात युतीचे सरकार

भारतीय जनता पार्टी आणि जेजेपी यांच्यात शुक्रवारी हरियाणाचे पुढील सरकार स्थापन करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी झाली. विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपा बहुमतापासून सहा जागा दूर होता. कराराअंतर्गत मुख्यमंत्री भाजपचे असतील तर उपमुख्यमंत्रीपद जेजेपीला देण्यात येईल. दुष्यंत चौटाला हे राज्याचे उपमुख्यमंत्री होतील.

शुक्रवारी रात्री दिल्लीत अमित शहा यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेत दुष्यंत चौटाला यांनी हरियाणामध्ये भाजपाला पाठिंबा देऊन युतीची घोषणा केली.

सहा वेळा भाजपचे आमदार असलेले अनिल विज, बनवारी लाल, सीमा त्रिखा आणि जेजेपीचे राम कुमार गौतम आणि ईश्वर सिंह यांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपप्रणित आघाडी सरकारला पाठिंबा देणार्‍या सात अपक्षांपैकी काही आमदार आणि दिवंगत देवी लाल यांचा मुलगा रणजित सिंग चौटालाही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मागील सरकारच्या काळात खट्टर यांच्या नेतृत्वात भाजपाचे ज्येष्ठ नेते विज हे आरोग्यमंत्री होते आणि ते सहाव्यांदा अंबाला कॅंटच्या जागेवरुन निवडून आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार महिपाल ढांढा, घनश्याम सर्राफ, कमल गुप्ता, सुभाष सुधा आणि दीपक मंगलही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

हे नेते शपथविधी सोहळ्यास लावणार हजेरी

हरियाणात मनोहर लाल खट्टर यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पक्षाच्या सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली आहे. गेल्या 26 ऑक्टोबर 2014 रोजी जेव्हा खट्टर यांनी शपथ घेतली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल उपस्थित होते.

First published: October 27, 2019, 7:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading