धक्कादायक! महात्मा गांधींचा अपघाती मृत्यू, पुस्तिकेत उल्लेखाने खळबळ

धक्कादायक! महात्मा गांधींचा अपघाती मृत्यू, पुस्तिकेत उल्लेखाने खळबळ

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ओडिसा सरकारने काढलेल्या पुस्तिकेत महात्मा गांधींचा मृत्यू अपघाती असा उल्लेख करण्यात आला आहे.

  • Share this:

भुवनेश्वर, 16 नोव्हेंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती यावर्षी देशभरात साजरी केली गेली. त्यानिमित्त ओडिसा सरकारने काढलेल्या एका पुस्तिकेत महात्मा गांधींचा अपघाती मृत्यू असल्याच्या उल्लेखाने वाद निर्माण झाला आहे. यामुळे ओडिसा सरकारला विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धारेवर धरलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी माफी मागावी आणि तात्काळ चूक दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ओडिसा सरकारच्या शिक्षण विबागाने एक लहान पुस्तिका प्रकाशित केली होती. आमा बापुजी : एका झलक अशी ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. त्यामध्ये गांधीजींनी दिलेली शिकवण, त्यांचे कार्य आणि ओडिसाशी असलेलं नातं याबाबत लिहण्यात आलं आहे. पण पुस्तिकेत गांधीजींचा मृत्यू अपघाती कारणाने झाल्याचं म्हटल्यानं वाद निर्माण झाला.

नवी दिल्ली इथल्या बिर्ला हाऊसमध्ये 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांचा अपघाती कारणामुळं मृत्यू झाला असं त्या पुस्तिकेल लिहिण्यात आलं आहे.  या पुस्तिकेचं वाटल राज्यातील सर्व शाळांमध्ये करण्यात आलं होतं. या पुस्तकात महात्मा गांधींच्या अनेक फोटोही आहेत.

गांधींजींचा अपघाती मृत्यू असा उल्लेख केल्याने विरोधक आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारव जोरदार हल्लाबोल केला आहे. युवा पिढीला चुकीचा इतिहास शिकवला जात असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या अक्षम्य चुकीबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, ओडिसाचे शालेय शिक्षण मंत्री समीर दास यांनी संबंधितांवर कारवाई कऱण्यात येईल असं सांगितलं आहे. तसेच जाणीवपूर्वक असा उल्लेख केलेला नाही. सरकार याकडे गांभीर्याने बघत असून प्रकरणाची चौकशी कऱण्यात येत आहे. याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल असंही दास म्हणाले.

जेव्हा स्मृती इराणी तलवारबाजी करता, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 08:27 AM IST

ताज्या बातम्या