Home /News /national /

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख जिओना चाना यांचं निधन; कुटुंबात 38 बायका आणि 89 मुले

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख जिओना चाना यांचं निधन; कुटुंबात 38 बायका आणि 89 मुले

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख मानले जाणारी जिओना चाना (Ziona Chana) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबात एकूण 181 लोक आहे. त्यांच्या एकूण 38 बायका आहेत. या सर्व बायकांना मिळून 89 मुलं आहेत.

    नवी दिल्ली, 13 जून : जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख मानले जाणारे जिओना चाना (Ziona Chana) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा (CM Zoramthanga) यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. चाना यांच्या कुटुंबात सध्या त्यांच्या एकूण 38 बायका आणि 89 मुलं आहेत. हे जगातलं सर्वात मोठं कुटुंब मानलं जात होतं, त्यामुळं मिझोरममधील पर्यटकांच्या आकर्षणाचे ते केंद्र होते. मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, "मिझोरम आणि बक्टावांग तलांगनममधील त्यांचे गाव हे चाना यांच्या कुटुंबामुळे राज्यात पर्यटकांचे एक मोठे आकर्षण केंद्र ठरले." जिओना चाना यांच्या कुटुंबातील महिला शेती करतात आणि घर चालविण्यास हातभार लावतात. चाना यांची सर्वात मोठी पत्नी प्रमुखाची भूमिका निभावत असून घरातील सर्वांना काम विभागून देवून त्यावर लक्ष ठेवते. चाना यांच कुटुंब जगातील सर्वात मोठं कुटुंब मानलं जातं. या कुटुंबात एकूण 181 लोक आहेत. या घराचे प्रमुख चाना हे होते. त्यांच्या एकूण 38 बायका आहेत. या सर्व बायकांना मिळून 89 मुलं आहेत. चाना यांचं इतकं मोठं भव्य कुटुंब मिझोराममधील बटवंग गावात 100 खोल्यांच्या मोठ्या घरात राहतं. या घरात एकूण 14 सुना आहेत. चाना यांना 33 नातवंड आहेत. 181 लोकांच्या या कुटुंबातील जास्तीत-जास्त महिलांचा वेळ हा जेवण बनवण्यातच जातो. या कुटुंबाचा सर्वात जास्त पैसा हा त्यांच्या खाण्या-पिण्यावरच खर्च होतो. एका रिपोर्टनुसार या कुटुंबाला एका दिवसात 100 किलो डाळ आणि तांदूळ लागतो. या हिशोब फक्त त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा आहे. नाष्ट्यासाठी रोज वेगवेगळे पदार्थ केले जातात, त्यासाठी लागणाऱ्या वस्तू वेगळ्याच आहेत. हे वाचा - …मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का? भाई जगतापांचा सरकारला घरचा आहेर एका वेळी या कुटुंबाला 40 किलो चिकन लागतं. तसेच चिकन नॉनवेज बनवण्यामध्ये त्यांचा जास्त वेळ जात असल्याने ते जास्तीत-जास्त शाकाहारी खाण्यावर भर देतात. घरात लागणारा जवळपास सर्व भाजीपाला घराशेजारीच पिकवला जातो, त्यामुळं बाजारात जाणाऱ्या पैशांचा खर्च वाचतो. हे कुटुंब घराच्या अंगणात, आजूबाजूला शेतात पालक, कोबी, मोहरी, मिरची, ब्रोकोली इत्यादी भाजीपाला पिके घेतात. घरातील बागेमुळं या कुटुंबाच्या खूप पैशाची बचत होते. कुटुंबातील स्त्रिया या भाजीपाला पिकविण्याकडे लक्ष देतात. विशेष म्हणजे त्यासाठी नैसर्गिक खते वापरतात. हे वाचा - लॉकडाऊनमध्येही 39 बायका सांभाळतो हा माणूस; घरात दिवसाला 100 किलो डाळ, तांदूळ आणि 40 किलो चिकन लागतं या कुटुंबातील पुरुष लोक शेती आणि जनावरांचं पालन करतात. यातून मिळणाऱ्या पैशांवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह मुख्यत्वे चालत. पण लॉकडाऊनमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल. अगोदर भाजीपाला आणि कुक्कुटपालनातून त्यांना चांगले पैसे मिळायचे, परंतु यावर सध्या लॉकडाऊनमुळं गदा आली. जिओना चाना हे 1942 मध्ये सुरू झालेल्या ख्रिश्चन ग्रुप चानाचे प्रमुख होते. त्यांच्यामध्ये एकापेक्षा अनेक लग्न करण्यास परवानगी आहे. या समाजात आत्तापर्यंत 400 कुटुंबांची नोंद आहे. यांचा मुख्य उद्देश आहे की, जास्तीत-जास्त मुलं जन्माला घालून समाज मोठा करणं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India

    पुढील बातम्या