मराठी बातम्या /बातम्या /देश /

30 दिवसात 22 भूकंप! भीतीपायी 'या' शहरातील लोकांनी सोडलं स्वत:च घर, रस्त्यावर थाटला संसार

30 दिवसात 22 भूकंप! भीतीपायी 'या' शहरातील लोकांनी सोडलं स्वत:च घर, रस्त्यावर थाटला संसार

कोरोना नाही तर भूकंपाची भीती! एका महिन्यात तब्बल 22 वेळा हे शहर हादरलं आहे.

कोरोना नाही तर भूकंपाची भीती! एका महिन्यात तब्बल 22 वेळा हे शहर हादरलं आहे.

कोरोना नाही तर भूकंपाची भीती! एका महिन्यात तब्बल 22 वेळा हे शहर हादरलं आहे.

    ऐजॉल, 23 जुलै : एकीकडे देशावर कोरोनाचे संकट आहे, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना देशातील काही भागांना भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. मिझोरम राज्यात गेल्या एका महिन्यापासून सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. म्यानमारच्या सीमेवर असलेल्या चंफाई जिल्ह्यात तर लोकांनी भूकंपाच्या भीतीने आपलं घर सोडलं आहे. लोकं सध्या रस्त्यावर तंबू बांधून राहत आहेत. मिझोरमच्या चार जिल्ह्यात चंफाई, सुईतुआल, सईहा आणि सेरछिप या भागात 18 जूनपासून आतापर्यंत तब्बल 22 भूकंप आले आहेत. ज्यांची तिव्रता 4.2 ते 5.5 यामध्ये होती. या चार जिल्ह्यांपैकी चंफाई जिल्हात सर्वात जास्त नुकसान झाले. भूकंपामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. आपल्या घरात राहण्याची लोकांना भीती वाटत असल्यामुळे रस्त्यांमध्ये तंबू बांधले आहे. वाचा-VIDEO: बिल्डिंगला आग लागली म्हणून चिमुरड्याने 40 फूटांवरून मारली उडी आणि... वाचा-धक्कादायक! डॉक्टरला खासगी रुग्णालयानं उपचारासाठी दिला नकार, कोरोनामुळे मृत्यू रस्त्यात बांधले अस्थायी तंबू चंफाई जिल्ह्याचे उपायुक्त मारिया सी टी जुआली यांनी येथील अनेक गावांमध्ये लोकांसाठी अस्थायी तंबू बांधले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच सोलर दिवेही पुरवण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे येथील लोकांनाच आपल्या घरात राहायचे नाही आहे. त्यामुळे जागोजागी तंबू बांधण्यात आले आहेत. वाचा-परीक्षेला बसलेले 3 विद्यार्थी निघाले पॉझिटिव्ह, 600 पालकांविरुद्ध गुन्हा दाखल कित्येक घरांचे झाले नुकसान उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिन्यात जवळजवळ 20 भूकंपाचे धक्के चंपाई जिल्ह्याला बसले. या भूकंपामुळे जिल्ह्यातील 16हून अधिक गावं प्रभावित झाली आहे. या घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांच्या भिंती खचल्या आहेत,तर इमारतींना तडे गेले आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या