मिझोराममध्ये काँग्रेस सरकार धोक्यात, काय आहे एक्झिट पोलमध्ये?

मिझोराममध्ये काँग्रेस सरकार धोक्यात, काय आहे एक्झिट पोलमध्ये?

रिपब्लिक आणि सी-वोटर यांच्या एक्झिट पोलनुसार, मिझो नॅशनल फ्रंट (MNF) हा पक्ष सत्तेचा जवळ जाताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : मिझोराममधील विधानसभा निवडणुसाठी काही वेळापूर्वीच मतदान झालं. आता या निवडणुकीच्या निकालाबाबतचे अंदाज एक्झिट पोलमधून समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेस सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याचं दिसत आहे.

रिपब्लिक आणि सी-वोटर यांच्या एक्झिट पोलनुसार, मिझो नॅशनल फ्रंट (MNF) हा पक्ष सत्तेचा जवळ जाताना दिसत आहे. तर सध्या सत्तेत असणाऱ्या काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. कुणालाही पूर्ण बहुमत मिळत नसल्याने अपक्षांना महत्व येणार आहे.

कुणाला किती जागा?

मिझो नॅशनल फ्रंट (MNF) - 18

काँग्रेस – 16

इतर – 6

एकूण जागा – 40

दरम्यान, विधानसभा निवडणूक झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या पाच राज्यांतील एक्झिट पोल समोर येत आहेत. या एक्झिट पोल्समधून प्रत्येकजण वेगवेगळे दावे करत असतो.

निवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल लागण्याआधी अनेकांचं या एक्झिट पोल्सकडे लक्ष लागलेलं असतं. प्रत्यक्षात यातील अनेक पोल चुकीचे ठरतात. तर काही एक्झिट पोल निकालाच्या जवळ जाणारे असतात. हे पोल नेमके कसे केले जातात, हे जाणून घेऊयात.

एक्झिट पोल हे नेहमी मतदानाच्या दिवशीच केले जातात. मतदान केल्यानंतर जेव्हा मतदार पोलिंग बूथमधून बाहेर पडतात, तेव्हाच एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांकडून मतदारांना त्यांचं मत विचारलं जातं.

मतदारांनी सांगितलेल्या माहिती एक्झिट पोल करणाऱ्या संस्था एकत्रित करतात. या संस्था प्रत्येक मतदाराचंच मत विचारात घेत नाहीत. तर त्यांनी एक सॅम्पल साईज ठरवलेली असते.

वेगवेगळ्या परिसरातील, वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींशी बोलून ही माहिती जमा केली जाते. त्याआधारेच निवडणूक निकालांबाबत अंदाज बांधला जातो.

राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन मोठ्या राज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राजस्थानमध्ये सत्ताबदलाची 20 वर्षांची परंपरा कायम राहते की तुटते हे पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 07:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading