मराठी बातम्या /बातम्या /देश /पश्चिम बंगाल निवडणुकीत मिथुन चक्रवर्ती आणि जया बच्चन आमने-सामने; दीदींचं भाजपला प्रत्युत्तर

पश्चिम बंगाल निवडणुकीत मिथुन चक्रवर्ती आणि जया बच्चन आमने-सामने; दीदींचं भाजपला प्रत्युत्तर

West Bengal Election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान (West Bengal Assembly Election) आता टीएमसीच्या सुप्रीमो ममता बनर्जी (Mamata Banerjee) यांच्या समर्थनार्थ भाजप विरोधी पक्ष एकत्र (Anti Bjp Parties) येत आहेत.

कलकत्ता, 4 एप्रिल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान (West Bengal Assembly Election) आता टीएमसीच्या सुप्रीमो ममता बनर्जी (Mamata Banerjee) यांच्या समर्थनार्थ भाजप विरोधी पक्ष एकत्र (Anti Bjp Parties) येत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी आधीच ममता बनर्जीसाठी टीएमसी उमेदवारांच्या समर्थनार्थ सभेचं आयोजन केलं होतं. आता समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan ) टीएमसी उम्मीदवारांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपने अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरवलं आहे.

ममता बँनर्जी यांच्यासाठी निवडणुकीचा प्रचार करणाऱ्यांच्या यादीच नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव सामील आहेत. नुकतेच ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून विरोधी दलातील नेत्यांना एकत्र येऊन लढण्याचं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा-मतदान केंद्रावर कोणतीही हिंसा नाही'; ममता बॅनर्जींचे आरोप EC नं फेटाळले

मंत्री अरुप विश्वास यांच्यासाठी जया बच्चन करणार प्रचार

ममता बॅनर्जी यांचे मंत्री सुब्रत बॅनर्जी यांनी रविवारी सांगितलं की, जया बच्चन रविवारी रात्री कलकत्त्याला पोहोचल्या. त्या 5 ते 8 एप्रिलपर्यंत बंगालमध्ये राहतील. कलकत्तात त्या टालीगंज पासून टीएमसीचे उमेदवार अरुप विश्वास यांच्या समर्थनार्थ रोड शो करतील. अरुप विश्वास यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी दिली आहे.

अनेक उमेदवारांसाठी जया बच्चन यांचा प्रचार

सुब्रत मुखर्जी यांनी सांगितलं की, जया बच्चन 6 आणि 7 एप्रिल रोजी राज्यातील विविध विधानसभेतील टीएमसी उमेदवारांच्या समर्थनार्थ रोड शो करतील.

First published:

Tags: Assembly Election 2021, BJP, Election, Mamata banerjee, West bangal