‘भारत माता की जय’ घोषणेचा दुरुपयोग, माजी पंतप्रधानांचा भाजपवर निशाणा

‘भारत माता की जय’ घोषणेचा दुरुपयोग, माजी पंतप्रधानांचा भाजपवर निशाणा

पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधा कृष्ण द्वारा लिखित ‘हू इज भारत माता’ या पुस्तकात नेहरुंची पत्रं, भाषण यांचा समावेश करण्यात आला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाबाबत (BJP) मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवाद (Nationalism) आणि भारत माता की जय (Bharat Mata Ki Jai) या घोषणेचा देशात दुरुपयोग केला जात आहे. या घोषणेच्या माध्यमातून अतिरेकी आणि निव्वळ भावनिक कल्पना तयार करण्यासाठी गैरवापर केला जात आहे, असं म्हणत सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला. मनमोहन सिंह यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणांवर आधारित असलेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्यादरम्यान हे वक्तव्य केलं आहे. जर भारताची लोकशाही एक उज्ज्वल लोकशाही म्हणून ओळखली जाते, जर भारताला जगातील शक्तींपैकी एक मानले जाते याचे श्रेय देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना जाते. सिंह पुढे जाऊन म्हणाले, नेहरुंनी विषम व अशांत परिस्थितीत भारताचे नेतृत्व केले. त्यावेळी भारताने लोकशाही ही जीवनशैली म्हणून स्वीकारली होती. त्यावेळी समाजात विविध सामाजिक व राजकीय दृष्टिकोन असलेले लोक होते. ते म्हणाले, भारताचा अभिमान बाळगणाऱ्या पंतप्रधानांनी या सर्व गोष्टी आत्मसात केल्या.

अनोखी शैली असलेले आणि बहुभाषी नेहरुंनी आधुनिक भारतात विश्वविद्यालये, अकादमी, सांस्कृतिक संस्थांचा पाया रचला. दुर्देवाने एक असा वर्ग आहे ज्यांच्याकडे इतिहास वाचण्याचं धैर्य नाही. जे जाणूनबुजून आपल्या पूर्वग्रहांनी चालत आहेत. ते नेहरुंची चुकीची प्रतिमा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र माझा विश्वास आहे की इतिहासात सर्व खोटे आक्षेप नाकारण्याची आणि उपयुक्त गोष्टींना योग्य दृष्टिकोनातून दाखविण्याची क्षमता आहे.

पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधा कृष्ण द्वारा लिखित ‘हू इज भारत माता’ हे एक क्लासिक पुस्तक आहे. यामंध्ये स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर, नेहरुंची भाषणे, लेख, पत्र आणि अनेक अव्यक्त गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हे पुस्तक लोकांसमोर येत आहे ज्यावेळी राष्ट्रवाद आणि भारत माता की जय या घोषणेचा अतिरेकी आणि निव्वळ भावनिक कल्पना तयार करण्यासाठी गैरवापर केला जात असल्याचे सिंह म्हणाले.

First published: February 23, 2020, 7:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading