पंतप्रधानांचा फोटो वापरताय? काळजी घ्या नाहीतर खावी लागेल तुरुंगाची हवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रच्या फोटोचा चुकीचा वापर केल्याच्या तक्रारीनंतर ग्राहक व्यवहार मंत्रालयाने चिन्ह आणि नाव यांच्या कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह मान्यवर व्यक्ती किंवा राष्ट्रीय चिन्ह यांचा चुकीचा तसेच व्यावसायिक फायद्यासाठी वापर केल्यास आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रच्या फोटोचा चुकीचा वापर केल्याच्या तक्रारीनंतर ग्राहक व्यवहार मंत्रालयाने चिन्ह आणि नाव यांच्या कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

मान्यवर व्यक्ती, नेते, सेलिब्रिटी यांच्यासोबतचे फोटो काढून सोशल मीडियावर अनेकजण पोस्ट करतात. तसेच या फोटोंचा काहीवेळा गैरवापरही केला जातो. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसोबत फोटो काढून त्याचा वापर करून इतरांची फसवणूक करण्याचे प्रकारही घडतात. याविरुद्ध आता सरकारकडून कठोर पावलं उचलण्यात येणार आहेत.

देशाचे राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या फोटोचा चुकीचा किंवा व्यावसायिक कारणासाठी वापर केल्यास कारवाई करण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. चिन्ह, फोटो आणि नावाचा चुकीचा वापर केला गेल्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

व्यवसायासाठी देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या फोटोचा चुकीचा आणि पूर्वपरवानगीशिवाय वापर केल्यास 1 ते 5 लाख रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याआधी राष्ट्रीय ध्वज, अशोक चक्र यांचा चुकीचा वापर केल्यास फक्त 500 रुपये इतका दंड आकारला जात होता.

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून डिजिटल इंडिया अभियानाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या फोटोचा वापर याआधी करण्यात आला होता. असे प्रकार यापुढे घडू नयेत म्हणून खबरदारी घेण्याच्या दृष्टीने नियम कडक करण्यात येत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2019 01:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading