मराठी बातम्या /बातम्या /देश /Mission Paani Waterthon : पाणीप्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अक्षय कुमारनं निवडला अनोखा मार्ग

Mission Paani Waterthon : पाणीप्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अक्षय कुमारनं निवडला अनोखा मार्ग

 #MissionPaani पाणी वाचवणं ही भविष्यासह वर्तमानाचीही गरज आहे. यासाठी News18 ने आयोजित केलेल्या Waterthon उपक्रमाला सुरुवात झाली.

#MissionPaani पाणी वाचवणं ही भविष्यासह वर्तमानाचीही गरज आहे. यासाठी News18 ने आयोजित केलेल्या Waterthon उपक्रमाला सुरुवात झाली.

#MissionPaani पाणी वाचवणं ही भविष्यासह वर्तमानाचीही गरज आहे. यासाठी News18 ने आयोजित केलेल्या Waterthon उपक्रमाला सुरुवात झाली.

मुंबई, 26 जानेवारी : नेटवर्क 18 च्या 'मिशन पानी वॉटरथॉन'मध्ये आता मोठमोठे सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार. अक्षय कुमारनं मिशन पानी वॉटरथॉनला (Mission paani Waterthon) आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक अनोखं पाऊल उचललं आहे.

अक्षय कुमारनं 21 किलोमीटरहून अधिक अंतर ट्रेडमिलवर (Treadmill) कापत आपला या विधायक उपक्रमात सहभाग दिला आहे. या कृतीमागे दररोज लांबचलांब अंतरावरून पाणी वाहून आणणाऱ्या महिलांचे कष्ट समजून घेणं हा यामागचा हेतू असल्याचे अक्षय म्हणाला. तो सांगतो, 'अगदी हाफ मॅरेथॉन (half marathon) पळतानाही धावपटुंना (athletes) विविध थांब्यांवर पाणी दिलं जातं. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र पाणी (water) वाहून आणणाऱ्या स्त्रियांचे (women) हाल भयानक असतात. आपण ते समजून घेण्याची गरज आहे.

अक्षय कुमारनं पाणी वाचवण्याचे (Saving water) तीन सोपे मार्गसुद्धा सांगितले. तो म्हणाला, आपण येणाऱ्या पाहुण्यांना केवळ अर्धा ग्लास पाणी दिलं पाहिजे. त्यांना अजून तहान असेल तरच ते अधिक पाणी मागतील. याशिवाय पाण्याची तोटी लहान धार असलेलीच वापरली पाहिजे असंही तो म्हणाला. तिसरा मार्ग म्हणजे घरात सेन्सर टॅप्स (sensor taps) वापरल्या पाहिजेत. यातून अधिकचे पाणी वाया जाणार नाही.

अक्षय कुमारला फिटनेस फ्रीक म्हणून ओळखलं जातं. त्यानं वेळोवेळी आपले अवघड फिटनेस सेशन्स आणि त्यादरम्यान पाण्याची आपल्या शरीराला तजेला मिळण्यासाठी झालेली मदत याबाबत भाष्य केलं आहे. पाणी वाचवण्याची निकड नेमकी काय आहे याबद्दल बोलताना अक्षय कुमारनं हायड्रोथेरेपीचे (Hydrotherapy) अनेक फायदे सांगितले. हायड्रोथेरेपी किंवा एक्वाथेरपी ही अत्यंत कठीण फिटनेस सेशन्स किंवा त्यादरम्यानच्या दुखापतींमधून सावरण्यासाठी वापरली जाते. हा ऍथलिट्ससाठीही दुखापतींमधून बाहेर येण्याचा एक लोकप्रिय आणि प्रभावी मार्ग बनला आहे.

मिशन पानी वॉटरथॉन हा न्यूज 18 आणि हार्पिक इंडियाचा एक उपक्रम आहे. अनेक मोठे सेलिब्रिटीज, नेते आणि बदल घडवणारे लोक एकत्र येत पाणी वाचवत येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगलं भविष्य राखण्यासाठी प्रबोधन करणार आहेत. या उपक्रमातून 'पानी की कहानी, भारत की जुबानी' या थीमच्या माध्यमातून भारतातील पाणीप्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Akshay Kumar