मराठी बातम्या /बातम्या /देश /Mission Paani : आजच जागं व्हा, चांगल्या भविष्यासाठी प्रत्येक थेंब वाचवा!

Mission Paani : आजच जागं व्हा, चांगल्या भविष्यासाठी प्रत्येक थेंब वाचवा!

पाणी टंचाईमुळे (Water Crises) नागरी संस्कृती नष्ट झाली. नद्यांचे प्रवाह आटले, नद्या लुप्त झाल्या या सारख्या अनेक लोककथा आहेत.पाण्याचा अपुरा साठा हे या देशातील मोठी लोकसंख्या गरीब राहण्याचं कारण आहे.

पाणी टंचाईमुळे (Water Crises) नागरी संस्कृती नष्ट झाली. नद्यांचे प्रवाह आटले, नद्या लुप्त झाल्या या सारख्या अनेक लोककथा आहेत.पाण्याचा अपुरा साठा हे या देशातील मोठी लोकसंख्या गरीब राहण्याचं कारण आहे.

पाणी टंचाईमुळे (Water Crises) नागरी संस्कृती नष्ट झाली. नद्यांचे प्रवाह आटले, नद्या लुप्त झाल्या या सारख्या अनेक लोककथा आहेत.पाण्याचा अपुरा साठा हे या देशातील मोठी लोकसंख्या गरीब राहण्याचं कारण आहे.

मुंबई, 20 जानेवारी :  पाणी टंचाईमुळे (Water Crises) नागरी संस्कृती नष्ट झाली. नद्यांचे प्रवाह आटले, नद्या लुप्त झाल्या या सारख्या अनेक लोककथा आहेत.  मानवी जीवनावर तसंच अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या यामुळे होणाऱ्या परिणामांची मोठी आकडेवारी आणि आधुनिक काळातील उदाहरणं देखील सांगता येतील. गेल्या अनेक वर्षांपासून आपण या सर्व गोष्टी अनुभवत आहोत. या आपत्तींना कधी नैसर्गिक संकट तर कधी हवामानातील हंगामी चढ-उतार असं एखादं तात्कालिक नाव दिलं तरी पाण्याचा कमी होत असलेला साठा हे या संकटांचं मुख्य कारण आहे.

आर्थिक संकट

पाणी टंचाईचा परिणाम हा एका मर्यादीत क्षेत्रापुरता मर्यादीत नसून तो व्यापक प्रमाणात जाणवतो. मुबलक पाणी पुरवठा असलेल्या भागात रहिवाशांना देखील यामुळे पाणी कपातीच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पाण्याचं व्यवस्थापन (Water Management) क्षेत्रातील कल्पता आणि गुंवणुकीचा अभाव यामुळे हे चक्र आणखी बिघडतं. त्यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

हवामानातील बदल

हवामानात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बदलांना क्लायमेट चेंज (Climate Change) हे नाव अनेकदा दिलं जातं. पर्यावरणीय असमतोल (ecological imbalance) वाढल्याचं देखील ते कारण आहे. शहरी भागात आलेल्या पुराच्या घटना हे नैसर्गिक पाण्याचं चक्र (natural water cycle) बिघडल्याचा परिणाम आहे. त्या भागातील पाण्याचा नैसर्गिक साठा कमी होणे, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होणे, अपुरा पाऊस आणि दुष्काळाच्या चक्रात त्या परिसराचा प्रवेश या सर्व गोष्टींचा हवामानातील बदलांसोबतच पाणी टंचाईशी देखील संबंध आहे.

गरिबीमध्ये वाढ

हवामानातील बदल आणि पाण्याचा अपुरा साठा हे या देशातील मोठी लोकसंख्या गरीब राहण्याचं कारण आहे. या नागरिकांचा दिवसातील मोठा वेळ हा पाण्यासाठी  दाही दिशांना भटकंती करण्यात जातो. त्यामुळे त्यांना त्यांच्या आर्थिक कमाईच्या कामांवर अक्षरश: 'पाणी' सोडावं लागतं.

काही भागात पाणी मिळाल्यानंतरही ते पुरेसं शुद्ध नसतं. त्यामुळे रोगराई, कुपोषण यासारख्या अनेक समस्या त्या भागात ठाण मांडून बसतात. खराब आरोग्य आणि स्वच्छतेचा अभाव या गोष्टी देखील त्या भागातील अपुरा पाणीपुरवठा आणि गरिबी याचं लक्षण आहे.

नोट : ‘मिशन पाणी’ हे News 18 ची खास मोहीम आहे.  पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या सोयी कमी असलेल्या परिसरात या मोहिमेच्या अंतर्गत काम केले जाते. देशातील प्रत्येक नागरिकांना या दोन्ही गोष्टींचा पुरेसा आणि समान वाटा मिळावा हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी तसंच पाणी वाचवणे आणि परिसर स्वच्छ राखण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी https://www.news18.com/mission-paani/ इथे भेट द्या.

First published:
top videos

    Tags: Drink water