Mission Paani: जल संवर्धनासाठी उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडूंनी सांगितला प्लॅन

पाण्याच्या वाढत्या मागणीसोबत त्याचा योग्य वापर करणं देखील आपल्याला समजायला हवं- उपराष्ट्रपती

पाण्याच्या वाढत्या मागणीसोबत त्याचा योग्य वापर करणं देखील आपल्याला समजायला हवं- उपराष्ट्रपती

  • Share this:
    नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : देशात जल संवर्धनासाठी खास Network 18 #MissionPaani या मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मोहिमेचं देशभरात कौतुक होत आहे. गुरुवारी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही सांगितले पाणी संवर्धनासाठी अशा पद्धतीची मोहीम इतरही माध्यमांनी करायला हवी. पाण्याचं संवर्धन, व्यवस्थापन आणि योग्य नियोजन यावर भर द्याययला हवा. प्रत्येकाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवा असंही यावेळी उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. पावसाचं पाणी योग्य पद्धतीनं साठवणं थोडक्यात अडवा आणि जिरवणं हे योग्य पद्धतीनं करायला हवं. देशातील प्रत्येक नागरिकानं जलयोद्ध्याची भूमिका निभावत पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वाचवता येईल यासाठी प्रयत्नशील असायला हवं. त्यासाठी वेगवेगळ्या गटांनी एकत्र येऊन उपाययोजना करायला हव्यात असंही यावेळी मार्गदर्शन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. हे वाचा-OMG! फक्त एक चमचा CORONAVIRUS पडला भारी; संपूर्ण जगाची वाट लावली घरापासून कार्यालयापर्यंत आपल्याला एकत्र यावं लागेल पाण्याची बचत करण्यासाठी वेगवेगळे मार्ग काढायचे आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगवर सर्वात जास्त भर द्यायला हवा. सगळीकडे त्याचा अवलंब करायला हवा. पाणी वाया जाऊ देऊ नका. हे काम केवळ सरकारचे नाही. आपल्याला सामूहिकरित्या पुढे यावे लागेल असंही असे उपराष्ट्रपती म्हणाले. उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथे कल्याणी नदीच्या पुनरुज्जीवनाचं उदाहरण यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलं आहे. पाण्याच्या वाढत्या मागणीसोबत त्याचा योग्य वापर करणं देखील आपल्याला समजायला हवं. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आपल्याला खूप जास्त भर द्यायला हवा असंही उपराष्ट्रपती म्हणाले.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: