Article 370, Kashmir : टॉप सिक्रेट होतं मोदींचं 'मिशन काश्मीर', अमित शहांनी अशी केली मोहीम फत्ते

Article 370, Kashmir : टॉप सिक्रेट होतं मोदींचं 'मिशन काश्मीर', अमित शहांनी अशी केली मोहीम फत्ते

राज्यसभेत काश्मीरबदद्लचं हे विधेयक मांडण्याआधी अमित शहा गृहमंत्रालयातल्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत होते. लष्कराच्या जवानांना दोन ते तीन तुकड्यांमध्ये काश्मीरला पाठवण्यात आलं. त्याचबरोबर संसदेच्या सत्राआधी कॅबिनेटची बैठक बोलावणं हा याच रणनीतीचा एक भाग होता.

  • Share this:

पायल मेहता

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारच्या अजेंड्यावर काश्मीरच होतं. मिशन काश्मीर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सिक्रेट मिशन होतं. मंत्रिमंडळातल्या महत्त्वाच्या मंत्र्यांनाही याचा थांगपत्ता नव्हता.

अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रिपद आल्यानंतर लगेचच काश्मीर प्रश्न सोडवण्याला आपलं प्राधान्य राहील हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अधिकारी सतर्क झाले आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या हालचालीही वाढल्या.

राजकीय डावपेचात माहीर असलेल्या अमित शहांनी त्यांच्या अजेंड्याची अमलबजावणी करायला सुरुवात केली. अमित शहांनी स्वत: श्रीनगरचा दौरा केला आणि कलम 370 रद्द केलं तर त्याचे काय परिणाम होतील याचाही अंदाज घेतला. यासाठीच अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 ऑगस्टपर्यंत लांबवण्यात आलं.

अमेरिकेनं चीनच्या विरोधात घेतला 29 वर्षातला मोठा निर्णय

यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत फ्लोअर मॅनेजमेंट केलं गेलं. अमित शहांनी जेव्हा राज्यसभेत हे विधेयक मांडलं तेव्हा हे विधेयक एकाच दिवसात मंजूर होईल, अशी अपेक्षा विरोधकांना नव्हती. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 125 आणि विधेयकाच्या विरोधात 61 मतं पडली. विरोधकांपैकी बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती आणि बहुजन समाज पक्षाचंही याला समर्थम मिळालं. यासाठी आधीच मोर्चेबांधणी करण्यात आली होती.

फ्लोअर मॅनेजमेंट कसं केलं?

संसदेत फ्लोअर मॅनेजमेंट करणं हे एक आव्हानच होतं. याची जबाबदारी पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि सीएम रमेश यांच्यावर सोपवण्यात आली. या तिन्ही नेत्यांनी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विश्वासात घेतलं. बिजु जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांना विश्वासात घेतलं गेलं.

खूशखबर! Article 370 हटवल्यामुळे आता भारताला मिळणार 'हा' नवा संघ

केंद्र सरकारने तिहेरी तलाक विधेयकाबद्दलही हीच रणनीती आखली होती. या 'मॅन टू मॅन स्ट्रॅटेजी' मुळे पुन्हा एकदा इतिहास घडला. राज्यसभेत काश्मीरबदद्लचं हे विधेयक मांडण्याआधी अमित शहा गृहमंत्रालयातल्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत होते. लष्कराच्या जवानांना दोन ते तीन तुकड्यांमध्ये काश्मीरला पाठवण्यात आलं. त्याचबरोबर संसदेच्या सत्राआधी कॅबिनेटची बैठक बोलावणं हा याच रणनीतीचा एक भाग होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार काश्मीरबद्दल काही ठोस भूमिका घेणार आहे याची माहिती फत्त मोजक्या 4-5 मंत्र्यांना होती. पण ही भूमिका नेमकी कुठली याची खबर मोदी आणि शहांच्या ऐवजी कुणालाही नव्हती.

शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स

काश्मीरच्या खोऱ्यात लष्कराच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हाच तिथल्या लोकांमध्ये नाराजी होती. अमरनाथ यात्रेकरूंना परत बोलवून त्यांना श्रीनगरमधून पाठवण्यात आलं तेव्हा काहीतरी मोठी गोष्ट होणार आहे याची कुणकुण लोकांना लागली. हे सारे पत्ते अमित शहांच्या कार्यालयातूनच हलत होते. लष्कर, गुप्तचर यंत्रणा, काश्मीरचे राज्यपाल, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा थेट अमित शहांच्या संपर्कात होते.

Article 370वर राहुल गांधींनी अखेर सोडलं मौन, म्हणाले...

या सगळ्या घडामोडींची प्रत्येक खबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली जात होती. पण कुणालाच हे माहीत नव्हतं की अमित शहा नेमकं काय करणार आहेत. अमरनाथ यात्रेकरूंना पुन्हा बोलवल्याबद्दल तिथल्या राजकीय पक्षांनी विरोध सुरू केला तेव्हा त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. हुरियत संघटनेमध्ये तर काश्मीर बंद ची हाक देण्याइतपतही ताकद उरलेली नव्हती.

कॅबिनेट बैठकीत ठरलं

सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर सोमवारी साडेदहा वाजचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी कॅबिनेटची बैठक बोलवण्यात आली. यामध्ये सगळ्या मंत्र्यांना 'मिशन काश्मीर' बद्दल माहिती देण्यात आली. पण जोपर्यंत अमित शहा राज्यसभेत हे विधेयक मांडत नाहीत तोपर्यंत प्रसारमाध्यमांशी बोलायला मंत्र्यांना बंदी घालण्यात आली. सरकारने नोटबंदीच्या वेळेसही अशीच रणनीती वापरली होती.

या कॅबिनेट बैठकीनंतर अमित शहा हसतहसतच संसद भवनात पोहोचले. यानंतर जे काही घडलं तो इतिहास आहे.

=========================================================================================================

VIDEO: कलम 370वरून राष्ट्रवादीत मतभेद, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजितदादा म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या