Home /News /national /

Mission Gaganyaan: अंतराळात पहिल्यांदाच घमघमणार चिकन टिक्का आणि मूग हलवा, असा असेल मेन्यू

Mission Gaganyaan: अंतराळात पहिल्यांदाच घमघमणार चिकन टिक्का आणि मूग हलवा, असा असेल मेन्यू

इस्रोच्या वतीनं या महत्वाकांक्षी 'गगनयान' अभियानासाठी अंतराळवीरांचे प्रशिक्षण जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून रशियामध्ये सुरू होणार आहे.

    नवी दिल्ली, 07 जानेवारी : ‘मिशन गगनयान’ अंतर्गत अवकाशात जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांसाठी अंतराळात खाण्यासाठी पदार्थ तयार करण्यात आले आहेत. या मिशनसाठी गुरुत्वाकर्षणरहित अंतराळात पाणी आणि ज्युस सारखे पेयही त्यांना देण्यात येणार आहे. यासगळ्याचे फोटो एएनआयनं ट्वीट केले. म्हैसूर स्थित संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळा (DFRL-Defence Food Research Laboratory) यांच्या वतीनं हे पदार्थ तयार करण्यात येत आहेत. या अंतराळवीरांना अंतराळात खाण्यासाठी या प्रयोगशाळेच्या वतीनं अंडी रोल, व्हेज रोल, इडली, मूग डाळ पुडिंग, पुलाव असे पदार्थ देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर हे जेवण गरम करण्यासाठी त्यांना एक हीटरही देण्यात येणार आहे. या मिशनसाठी आतापर्यंत 22 प्रकारचे पदार्थ तयार करण्यात आले आहे. यात हलक्या पद्धतीचे, ड्राय फ्रुट्स आणि फळेही देण्यात येणार आहे. डीएफआरएलचे संचालक डॉ. अनिल दत्त यांनी, “हे अन्न निरोगी आहे आणि वर्षभर टिकू शकते”, असे सांगितले. तसेच, “कोणत्याही अंतराळवीरांना मटण किंवा चिकन खाण्याची इच्छा असल्यास आम्ही चिकन करी आणि बिर्याणीची व्यवस्था केली आहे. हे पॅकेट गरम करून खाल्ले जाऊ शकते”. अशी माहिती अनिल दत्त यांनी दिली. इस्रोच्या वतीनं या महत्वाकांक्षी 'गगनयान' अभियानासाठी अंतराळवीरांचे प्रशिक्षण जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून रशियामध्ये सुरू होईल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केली होती घोषणा 15 ऑगस्ट 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून 2022पर्यंत भारत अवकाश क्षेत्रात जोरदार प्रगती करेल, अशी घोषणा केली होती. 2022मध्ये भारत आपल्या मुला-मुलींना अंतराळात पाठवेल, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून या मोहिमेचे नाव 'गगनयान' ठेवले. इस्रोचे अध्यक्ष शिवन म्हणाले की, रशियामध्ये कोण प्रशिक्षण देईल या चार अंतराळवीरांची निवड झाली आहे. ते म्हणाले की गगनयानसाठी एक राष्ट्रीय सल्लागार समिती गठित केली गेली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या