गुवाहाटी, 1 मार्च : आसामच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांची एन्ट्री झाली आहे. प्रियांका गांधी दोन दिवसाच्या आसाम (Assam) दौऱ्यासाठी पोहोचल्या आहेत. येथे पोहोचल्यानंतर सोमवारी सर्वात आधी त्यांनी गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतलं.
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा सोमवारी सकाळी गुवाहाटीला पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन पूजा केली. प्रियांका गांधी यांनी आसाममध्ये लखीमपूरमधील स्थानिकांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत आदिवासी नृत्यही केलं. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
চাহ বাগানৰ যুৱক যুৱতী সকলৰ সৈতে আজি লক্ষীমপুৰত এনেদৰে ঝুমুৰ নৃত্যত অংশগ্ৰহণ কৰে নিখিল ভাৰত কংগ্ৰেছ কমিটিৰ সাধাৰণ সম্পাদিকা শ্ৰীমতী @priyankagandhi ডাঙৰীয়ানীয়ে#PriyankaGandhiWithAssam pic.twitter.com/5DSLggqd9X
— Assam Congress (@INCAssam) March 1, 2021
प्रियांका गांधी यांनी लखीमपूरमध्ये रोजगाराच्या मुद्द्यावरुन अभियानाची सुरुवात केली. यानुसार काँग्रेस येत्या काही दिवसात राज्यातील सरकारी कार्यालयांबाहेर आंदोलन करणार आहे. कामाख्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी ट्वीटही केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं, आज कामाख्या देवीचं दर्शन घेण्याची संधी मिळाली. कामाख्या देवीकडे देशातील सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
Smt. @priyankagandhi spends intimate moments with the tea tribes of Lakhimpur to better understand & experience their culture. #PriyankaGandhiWithAssam pic.twitter.com/QTCru3mmTC
— Congress (@INCIndia) March 1, 2021
प्रियांका गांधी आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्याबरोबरच मंगळवारी तेजपूरमध्ये प्रियांका गांधी एका महारॅलीला संबोधित करतील. आसाममध्ये यंदाच्या वर्षी तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. 27 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान मतदान होणार आहे. 2 मे रोजी निकाल समोर येईल.
हे ही वाचा-कोरोना लस घेण्यास काँग्रेस नेते खर्गेंचा नकार, सांगितलं 'हे' मोठं कारण
उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी सक्रीय
प्रियांका गांधी वाड्रा या उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत, मात्र स्टार कॅम्पेनर म्हणून त्या पाच राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी सांभाळत आहेत. तामिळनाडू, बंगाल, आसाम, केरळ आणि पाँडिचेरीच्या निवडणुकीत प्रियांका गांधी यांचा हा पहिला निवडणुकीय दौरा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assam, Congress, Priyanka gandhi