'जिलेबी खाताना शेवटचे दिसले होते; तेव्हापासून बेपत्ता आहेत'; भाजप खासदारचे पोस्टर चर्चेत

'जिलेबी खाताना शेवटचे दिसले होते; तेव्हापासून बेपत्ता आहेत'; भाजप खासदारचे पोस्टर चर्चेत

दिल्लीसारख्या मेट्रो शहरात लोकप्रतिनिधी बेपत्ता असल्याचे पोस्टर लागले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लोकप्रतिनिधी मतदारसंघात फिरकत देखील नाहीत हा अनुभव नवा नाही. सर्व साधारणपणे ग्रामीण भागातील हा अनुभव देशाची राजधानी नवी दिल्लीतील मतदारांना आला आहे. दिल्लीसारख्या मेट्रो शहरात लोकप्रतिनिधी बेपत्ता असल्याचे पोस्टर लागले आहेत. विशेष म्हणजे हा खासदार अन्य कोणत्या पक्षाचा नसून खुद्द सत्ताधारी भाजप(BJP)चा आहे.

देशाची राजधानी नवी दिल्लीतील पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir)बेपत्ता असल्याचे पोस्टर लागले आहेत. हे पोस्टर ITO परिसरातील झाडांवर आणि भिंतींवर लावण्यात आले आहेत. पोस्टवर गंभीरचा फोटो लावण्यात आला आहे आणि लिहले आहे की, तुम्ही गौतम गंभीरला कुठे पाहिले आहे का. ते अखेरचे इंदूरमध्ये जिलेबी खाताना दिसले होते. तेव्हापासून बेपत्ता आहेत. पूर्ण दिल्लीकर यांचा शोध घेत आहेत.

गेल्याच आठवड्यात दिल्लीतील प्रदूषणासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीस दिल्लीचे खासदार म्हणून गंभीरने उपस्थित राहणे अपेक्षित होते पण तेव्हा ते इंदूरमध्ये होते. इंदूरमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी समालोचक म्हणून गंभीर तेथे होता. तेव्हा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस.लक्ष्मम यांच्या सोबत जिलेबी आणि पोहे खाताना गंभीरचा फोटो समोर आला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षाने गंभीर बैठकीस हजर राहिला नाही यावरून त्याच्यावर हल्ला चढवला होता. प्रदूषणासंदर्भात राजकीय आरोप करण्यासाठी गंभीर नेहमीच आघाडीवर असतात पण त्यावर उपाय योजना करण्यासाठी मात्र गंभीर उपस्थित नव्हता, असे 'आप'ने म्हटले होते.

दिल्लीतील प्रदूषणासंदर्भात उपाय योजना करण्यासाठी आयोजित बैठकीस गंभीर उपस्थित नव्हता. यावर 'आप'ने त्यांच्या ट्विटरवरून गंभीरचा जिलेबी खात असतानाचा फोटो शेअर केला होता. या बैठकीसंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींना एक आठवडाआधी सांगण्यात आले होते. पण या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी खासदारांकडे वेळ नाही. दिल्लीच्या प्रदूषणाचा विषय कॉमेंट्री बॉक्सपुरता मर्यादीत आहे की काय असा सवाल 'आप'ने केला होता.

Published by: Akshay Shitole
First published: November 17, 2019, 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading