Home /News /national /

रायबरेलीत झळकले काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स

रायबरेलीत झळकले काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स

संपूर्ण देशासमोर कोरोना व्हायरसचं संकट उभं आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

    रायबरेली, 29 मार्च: संपूर्ण देशासमोर कोरोना व्हायरसचं संकट उभं आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, उत्तर प्रदेशात सद्यस्थितीतही राजकारण केलं जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर रायबरेलीत लावण्यात आल्याचा प्रकार शनिवारी रात्री समोर आला. विशेष म्हणजे रायबरेली हा सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदार संघ आहे हेही वाचा..RBI गव्हर्नर यांनी जारी केला VIDEO, अधिकाधिक डिजिटल व्यवहार करण्याचा दिला संदेश 'चिट्ठी न कोई संदेश' असं पोस्टरचे शीर्षक आहे. सगळ्यात धनाढ्य खासदारांपैकी एक असलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीला कोणतीही आर्थिक मदत दिली नाही, याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच "तुम्हारा हाथ, न जाने हमारा साथ/सबसे बुरी भूल, तुमको किया कबूल", असा संदेश लिहिला आहे. शेवटी रायबरेली जागरुक मंच असं लिहिलं आहे.  दरम्यान, या पोस्टरवर कोणाचेही नाव नाही. मात्र, पोस्टर्सवर प्रकाशकाचं नाव प्रसिद्ध करणे अनिवार्य असते. हेही वाचा..लॉकडाऊनमध्ये सलमान खानसंदर्भात मोठी बातमी, 25,000 रोजंदार कामगारांना मदतीचा हात दरम्यान, सोनिया गांधी यांनी शुक्रवारी रायबरेलीचे जिल्हाधिकारी यांना एक पत्र लिहले होते. आपल्या मतदार संघात कोरोनो व्हायरसशी दोन हात करण्यासाठी एमपीएलएडी योजनेसह सर्व निधि देण्याचे आश्वासन दिले होते.  याबाबत काँग्रेस नेते कमलसिंह चौहान यांनी सांगितलं की, या पोस्टर्सच्या माध्यमातून विरोधकांनी त्यांची मानसिकता दाखवून दिली आहे. संकटमय परिस्थितीचा फायदा घेऊन राजकारण करत आहे. हेही वाचा..Jio ची धमाकेदार ऑफर! 21 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार डबल डेटा सोनिया गांधी कायम रायबरेलीच्या संपर्कात असतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खालदार निधी दिला आहे. रायबरेलीतील जनतेला सत्य माहीत आहे. विरोधकांनी कितीही राजकारण केलं तरी जनतेचा विश्वास कमी होणार नाही, असं कमलसिंग चौहान यांनी म्हटलं आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष पंकज कुमार यांनी पोस्टर लावणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या