ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानला द्याव्या लागतील या सुविधा

ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानला द्याव्या लागतील या सुविधा

जिनेव्हा करारानुसार अशा कुठल्याही कैद्याचं हे त्या देशाशी वयक्तिक वैर नसतं. तो त्याचा जन्म झालेल्या देशासाठी लढत असतो.

  • Share this:

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : भारताचा विंग कमांडर अभिनंदन हा पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं भारतान म्हटलं आहे. अभिनंदनची  तातडीने आणि सुरक्षीत सुटका करावी अशी मागणीही भारताने केली आहे. पाकिस्तानी लष्कराने ज्या बिभत्सपणे त्या जखमी पायलटचा व्हिडीओ प्रसिद्ध केला त्यावरही परराष्ट्रमंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.


जिनेव्हा करारानुसार अशा युद्धकैद्याला कशी वागणूक द्यावी याचे काही नियम ठरले असून त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास त्या देशाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वाळीत टाकले जाते. सेंटर फॉर द स्‍टडी ऑफ सोसायटी अँड पॉलिटिक्‍स चे संचालक प्रा. एके वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जिनेव्हा करारानुसार अशा कुठल्याही कैद्याचं हे त्या देशाशी वयक्तिक वैर नसतं.


तो त्याचा जन्म झालेल्या देशासाठी लढत असतो. त्यामुळे त्या जवानाला परत करणं त्या देशाला बंधनकारक असतं. त्या जवानाच्या इच्छेविरूद्ध त्याची चौकशी करता येत नाही किंवा त्याच्यावर दबावही आणता येत नाही. त्याला वैद्यकीय सुविधा देण्याचं बंधनही त्या देशांवर असतं. मुत्सद्देगिरीच्या पातळीवर हा प्रश्न सोडवावा लागतो.


अशी आहे अभिनंदची कामगिरी

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-16 या विमानाला पिटाळून लावताना भारताचं MiG-21 हे लढाऊ विमान कोसळलं होतं. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हा त्या विमानाचा पायलट होता. विमान कोसळल्यानंतर तो पाकिस्तानच्या हद्दीत उतरला आणि त्याला पाकिस्तानने ताब्यात घेतलं.


जखमी अवस्थेतल्या अभिनंदन याचे व्हिडीओ पाकिस्तानी माध्यमांनी आणि लष्कराने व्हायरल केले होते. आंतरराष्ट्रीय करारानुसार अशा पायलटला योग्य वागणूक दिली जावी असा नियम आहे. त्याला संबंधीत देशाच्या स्वाधीन करावं असंही त्या करारामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानकडे ती मागणी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या