नवी दिल्ली, 11 जून : Indian Air Forceचं 3 जून रोजी बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचे अवशेष सापडले आहेत. विमानानं उड्डाण केलेल्या ठिकाणाहून 15 ते 50 किमी अंतरावर हे अवषेश अरूणाचलमध्ये सापडले आहेत. सोमवारी, 3 जूनला हे विमान अरुणाचल प्रदेशमधून गायब झालं होतं. त्यानंतर बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर आणि विमानं तैनात करण्यात आली होती. अखेर 8 दिवसानंतर विमानाचा शोध लागला आहे. विमानाचा शोध घेण्यासाठी स्थानिक लोकांची देखील मदत घेण्यात आली होती. 3 जून रोजी जोरहाट इथून या विमानानं दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी उड्डाण केलं. त्यानंतर मेंचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर या विमानाचं लँडिंग होणं अपेक्षित होतं. पण, उड्डाणानंतर अर्ध्या तासात या विमानाचा जमिनीशी संपर्क तुटला. दुपारी 1 वाजता या विमानानं जमिनीवरच्या कक्षाशी संपर्क साधला होता. पण तो शेवटचा. त्यानंतर विमानाकडून कुठलाही संदेश किंवा संपर्क झालेला नव्हता. या विमानामध्ये 8 क्रू मेंबर आणि इतर 5 असे एकूण 13 प्रवासी होते.
The location of the parts of aircraft, believed to be that of missing AN-32, is 15-20 kilometers north of the flight path of the AN-32 aircraft in Arunachal Pradesh. Indian Air Force (IAF) chopper teams were involved in this mission. https://t.co/UCTC7QQiqi
ज्यावेळी हे विमान बेपत्ता झालं ते विमान पायलट आशिष तन्वर चालवत होते. आशिष हरियाणामधल्या पलवलचे रहिवासी आहेत. त्यांची पत्नी संध्या याही हवाऊ दलाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागात काम करतात.
ज्यावेळी आशिष यांच्या विमानाने अरुणाचल प्रदेशच्या दिशेने उड्डाण केलं त्यावेळी त्यांची पत्नी संध्या जोरहाटमध्ये ड्युटी करत होत्या. आशिष यांनी संध्या यांच्यासोबत 18 मे रोजी सुटी घालवली आणि ते कामावर रुजू झाले. संध्या यांच्याकडे आता त्यांच्या पतीच्या याच आठवणी उरल्या आहेत.
गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया