धक्कादायक! शाळेत 3 वर्षाची चिमुरडी भाजीच्या उकळत्या टोपात पडली, शिक्षकांनी घाबरून काढला पळ

धक्कादायक! शाळेत 3 वर्षाची चिमुरडी भाजीच्या उकळत्या टोपात पडली, शिक्षकांनी घाबरून काढला पळ

शाळेत मिड-डे जेवणाची तयारी केली जात असलेल्या भाजीच्या गरम मोठ्या टोपात पडून एका तीन वर्षांच्या मुलीचा मुलीचा मृत्यू झाला.

  • Share this:

मिर्जापूर, 04 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. शाळेत मिड-डे जेवणाची तयारी केली जात असलेल्या भाजीच्या गरम मोठ्या टोपात पडून एका तीन वर्षांच्या मुलीचा मुलीचा मृत्यू झाला. जेवणाची तयारी केली जात असताना ही मुलगी या गरम टोपात पडली. मोठ्या प्रमाणावर अग भाजल्यामुळं या चिमुरडीचा मृत्यू झाला. आंचल असे या चिमुरडीचे नाव असून मडीहान पोलिस ठाण्याच्या रामपूर अटारी गावात रुग्णालयात मृत्यू झाला. घरी हट्ट करून ही चिमुरडी आपल्या भावांबरोबर अभ्यासाचा आग्रह धरून शाळेत गेली होती.

सोमवारी दुपारी जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा स्वयंपाकी कानात इअर फोन टाकून गाणे ऐकत होती. दरम्यान खेळता खेळ गरम भांड्यात पडलेल्या या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न न करता स्वयंपाक घरातील महिलांना तेथून पळ काढला. या प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकास निलंबित करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा-‘नाइट लाइफ’ म्हणजे फक्त मौजमजा, छंद-फंद नाहीत - उद्धव ठाकरे

वाचा-अशी अद्दल घडलीच नसेल! तोंडात रॉकेल घेऊन करत होता आगीचे खेळ आणि...

मुख्याध्यापकास निलंबित करण्याचे आदेश

या प्रकरणात मिरजापूरचे जिल्हादंडाधिकारी सुशील कुमार पटेल यांनी मुख्याध्यापकास निलंबित करण्यासह गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. रामपूर अत्री विद्यालयात मुलांसाठी मिड-डे जेवण केले जात होते. यावेळी, तेथेच स्वयंपाकघरात स्वयंपाकी कानात इअर फोन घालून गाणे ऐकण्यात तर्क होती. त्याचवेळी आंचलचा अपघात झाला.

वाचा-सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपडला पण त्याच्यावर काळाचा घाला, अपघातात जागीच ठार

त्या शाळेची विद्यार्थी नव्हती आंचल

मिर्जापूर बेसिक एज्युकेशन ऑफिसर यांनी सांगितले की, 'हे प्रकरण माझ्या हाती आले आहे. संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांकडून अहवाल आल्यानंतर मी याची चौकशी करून घेईन. तपासणीनंतर कारवाई केली जाईल. मला सांगितले जात आहे की ती मुलगी या शाळेतील विद्यार्थी नव्हती”. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून शाळेत येत होती आणि अजूनही वर्गात बसायची शिकत होती. मुलांबरोबर खेळत असताना ती भाजीच्या टोपात पडून गंभीर जखमी झाली. स्थानिक रुग्णालयानंतर तिला उपचारासाठी विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे काही तासांच्या उपचारानंतर सायंकाळी आंचलचे निधन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2020 10:17 AM IST

ताज्या बातम्या