IndiaStrikesBack- पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये दहशतवादी करायचे 'हे' काम, म्हणून भारतीय वायुलदलाने केलं Air Strike

IndiaStrikesBack- पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये दहशतवादी करायचे 'हे' काम, म्हणून भारतीय वायुलदलाने केलं Air Strike

भारतीय वायुदलाने माघारी परतताना घाई गडबडीत रिकाम्या जमिनीवर बॉम्ब हल्ला केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला

  • Share this:

नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी २०१९- पाकिस्तानातील खैबर- पख्तूनख्वा प्रांतातील मानशेरा जिल्ह्यात बालाकोट हे शहर आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचं गृहराज्यही खैबर पख्तूनख्वाच आहे. रिपोट्सनुसार २००१ दरम्याच्या काळात जैश-ए-मोहम्मद म्होरक्या मसूद अजहर याच भागात राहायचा. इथूनच तो जैश-ए-मोहम्मद संघटना चालवतो आणि इथूनच लॉन्चपॅड चालवले जातात.

भारतीय वायुदलाने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या अल्फा ३ कंट्रोल रूमला नेस्तनाबूत केले. २००१ मध्ये इंटेलिजन्स एजन्सींनी सांगितलं होतं की, बालाकोट परिसरात जैश-ए-मोहम्मद रॅलाही करतं. बालाकोट येथील बेसयान चौक येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षणही देण्यात येतं. असंही म्हटलं जातं की, हा तोच परिसर आहे जिथे अमेरिका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या दहशतवादी कारवाईचं प्लॅनिंग केलं होतं.

पुलवामानंतर १५ दिवसांच्या आत घेतला बदला-

हा एअर स्ट्राइक पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन आठवड्यात करण्यात आला. १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर हल्ला केला. यात ४० जवान शहीद झाले. पाकिस्तानमध्ये बसून दहशतवादी हल्ल्याचं प्लॅनिंग करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

पाकिस्तानचं काय आहे म्हणणं...

मंगळवारी पाकिस्तानकडून दोन ट्वीट करण्यात आले. यात भारतावर आरोप करताना पाकिस्तानने म्हटले की, भारतीय वायुदलाने नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट करून या हल्ल्याबद्दल माहिती दिली. ट्वीट करत आसिफ यांनी म्हटलं की, ‘भारतीय वायु दलाने नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं. पाकिस्तानच्या वायु दलाने लगेच कारवाई केली आणि भारतीय विमानांना परत पाठवण्यात आलं.’ यानंतर त्यांनी असाही दावा केला की, भारतीय वायुदलाने माघारी परतताना घाई गडबडीत रिकाम्या जमिनीवर बॉम्ब हल्ला केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल

First published: February 26, 2019, 3:14 PM IST

ताज्या बातम्या