मराठी बातम्या /बातम्या /देश /बालकृष्णासारखं नदीच्या पूरातून चिमुरड्याला वाचवलं; Video पाहून अंगावर काटा उभा राहील!

बालकृष्णासारखं नदीच्या पूरातून चिमुरड्याला वाचवलं; Video पाहून अंगावर काटा उभा राहील!

गोदावरी नदीला नुकत्याच आलेल्या पुरामुळे गाव जलमय झाले होते. त्यामुळे येथे बहुतांश घरांमध्ये पाणी साचले होते. रस्ते वाहतूक जवळच्या शहराशी जोडलेली असल्याने गावकऱ्यांना पाणी साचलेल्या घरांमधून बाहेर पडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

पुढे वाचा ...

पुनम श्रीनिवास, 

करीमनगर, 15 जुलै : श्रीमद्भावत कथेमध्ये श्रीकृष्णाच्या जन्माचे वर्णन आहे. तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर पिता वासुदेव यांनी श्रीकृष्णाला मथुरेहून गोकुळात पोहोचवण्यासाठी मुसळधार पावसात पुराच्या पाण्यात डोक्यावर टोपली ठेवली आणि त्या टोपलीत श्रीकृष्णाला ठेवून गोकुळात पोहोचलवले. अशाच एक प्रकार तेलंगणातील पड्डेपल्ली जिल्ह्यात समोर आला आहे.

नेमकं काय घडलं -

सध्या तेलंगणात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. अशा परिस्थितीत घरातील मोठी व्यक्ती एक नवजात बाळाला डोक्यावर टोपली ठेवून पुरातून घेऊन जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना तेलंगणा राज्यातील पड्डेपल्ली जिल्ह्यातील मंथनी येथील मरीवाडा गावात घडली.

गोदावरी नदीला नुकत्याच आलेल्या पुरामुळे गाव जलमय झाले होते. त्यामुळे येथे बहुतांश घरांमध्ये पाणी साचले होते. रस्ते वाहतूक जवळच्या शहराशी जोडलेली असल्याने गावकऱ्यांना पाणी साचलेल्या घरांमधून बाहेर पडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

दरम्यान, एका कुटुंबात नवजात बाळाचा जन्म झाला आणि या नवजात बाळाला वाचवण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींपैकी एकाने एक धाडसी पाऊल उचलले. त्यांनी एका अ‍ॅल्युमिनिअमच्या टोपलीत त्यात कपड्यात त्या बाळाला ठेवले. यानंतर ती टोपली आपल्या डोक्यावर ठेवून त्या पाण्यातून मार्ग काढत बाळाला सुरक्षित स्थळी आणले. गावातील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा - पत्नीनं मंगळसूत्र काढलं म्हणून पतीला मिळाला घटस्फोट, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

तसेच नवजात बालकाला वाचवणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे, गावकरी संबंधित अधिकाऱ्यांना व्हिडिओचा हवाला देऊन त्यांना वाचवण्यासाठी NDRF टीम पाठवण्याची विनंती करत आहेत.

First published:

Tags: Rain, Telangana