Home /News /national /

थरारक घटना! धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर रेप करणाऱ्या नराधमाशी भिडली आई, 12 तास ठेवलं पकडून

थरारक घटना! धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर रेप करणाऱ्या नराधमाशी भिडली आई, 12 तास ठेवलं पकडून

Minor Girl Rape in Kalyan: धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार झाल्याचं कळताच पीडितेच्या आईनं नराधम आरोपीला शोधून त्याला तब्बल 12 तास पकडून ठेवलं होतं.

    कल्याण, 19 फेब्रुवारी: काही दिवसांपूर्वी अचानक ट्रेनमध्ये घुसलेल्या सात ते आठ जणांनी एका 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang rape in running train) केला होता. यावेळी आरोपींनी प्रवाशांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून मौल्यवान ऐवज लंपास केला होता. इगतपुरी ते कसारा रेल्वेस्थानकादरम्यान घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असताना धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor girl rape in express train) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस येताच, पीडितेच्या आईनं नराधम आरोपीला शोधून त्याला तब्बल 12 तास पकडून (victim's mother hold accused for 12 hours) ठेवलं होतं. कल्याणला पोहोचल्यानंतर महिलेनं नराधम आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrested) केली असून पुढील कारवाई केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील भदोई येथील एक महिला तिची आई आणि दोन मुलं आणि दोन मुली गोरखपूर दादर काशी एक्स्प्रेसने कल्याणला येत होते. हेही वाचा-बदला घेण्यासाठी पार केली हद्द; HIV पॉझिटिव्ह पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य फिर्यादी महिलेचा पती बदलापूर याठिकाणी नोकरीस आहे. तर फिर्यादी महिला अलीकडेच आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेल्या होत्या. घटनेच्या दिवशी त्या आपल्या आईसह मुलांना घेऊन परत कल्याणला येत होत्या. सर्वजण मेल एक्स्प्रेसच्या जनरल बोगीतून प्रवास करत होते. दरम्यान इटारसी रेल्वे स्थानक येताच फिर्यादीच्या 6 वर्षाच्या लहान मुलीनं रडायला सुरुवात केली. याबाबत तिची विचारपूस केली असता तिच्यावर कोणीतरी लैगिंक अत्याचार केल्याचं अल्पवयीन मुलीनं सांगितलं. हा प्रकार आईला कळाल्यानंतर तिने संपूर्ण बोगीत आरोपीचा शोध घेतला. अखेर नराधम आरोपीही सापडला. पीडित मुलीने आरोपीला ओळखलं. हेही वाचा-अल्पवयीन मुलीसोबत किळसवाणं कृत्य; नराधमाने दुचाकीने घरी सोडण्याचा बहाणा केला अन् यानंतर महिलेनं आरोपीला धावत्या रेल्वेत चांगलाच चोप दिला. शिवाय त्याला कल्याण स्टेशन येईपर्यंत म्हणजेच तब्बल 12 तास एकाच ठिकाणी पकडून ठेवलं आहे. कल्याण स्टेशनवर गाडी पोहोचल्यानंतर महिलेनं नराधम आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं आहे. पण अत्याचाराची घटना इटारसी याठिकाणी घडल्यानं कल्याण पोलिसांनी आरोपीला इटारसी पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. इटारसी पोलिसांचं एक पथक कल्याणला येऊन आरोपीला अटक केलं आहे. पोटच्या लेकीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आईनं तब्बल 12 तास पकडून ठेवल्याने पोलिसांनीही महिलेचं कौतुक केलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kalyan, Rape, Rape on minor

    पुढील बातम्या