मराठी बातम्या /बातम्या /देश /

संतापजनक..! 10 वर्षीय मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून बलात्कार, व्हॉट्सअॅपवरील VIDEO पाहून वडील हादरले!

संतापजनक..! 10 वर्षीय मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून बलात्कार, व्हॉट्सअॅपवरील VIDEO पाहून वडील हादरले!

धक्कादायक म्हणजे हे कृत्य करणारी मुले ही 8 ते 14 वर्षे वयोगटातील असून यातील एकजणच अठरा वर्षांचा आहे. इतक्या कमी वयाच्या मुलांनी बलात्काराचा गुन्हा केल्यानं आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

  • Published by:  News18 Desk

रेवाडी, 09 जून : एका 10 वर्षीय मुलीवर तिच्या शाळेतील परिसरात 7 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस (rape on minor girl) आली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 6 मुले ही अल्पवयीन आहेत. 24 मे रोजी हा सर्व प्रकार घडला होता. मात्र, या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंधित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नराधम अल्पवयीन मुलांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो काहींच्या व्हाट्सअपवर (Rape Video Viral On Whatsapp) पाठवला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ही दुर्दैवी घटना हरियाणामधील रेवाडीच्या रामपुरा पोलीस ठाणे परिसरातील आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी (Minor Girl Rape) तिसरीच्या वर्गात शिकत आहे. 24 मे रोजी ती घराजवळच असलेल्या शाळेच्या मैदानात खेळत होती. त्या वेळी आजूबाजूला असलेल्या या मुलांनी तिला पकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे हे कृत्य करणारी मुले ही 8 ते 14 वर्षे वयोगटातील असून यातील एकजणच अठरा वर्षांचा आहे. इतक्या कमी वयाच्या मुलांनी बलात्काराचा गुन्हा केल्यानं आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील शूट केला होता.

हे वाचा - VIDEO: शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण

व्हॉट्सअपवरून फिरणारा व्हिडिओ जेव्हा मुलीच्या वडिलांना दिसला तेव्हा त्यांना जबर हादरा बसला आणि त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तातडीनं गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमधील दोघेजण हे संबंधित मुलीच्या कुटुंबातीलच आहेत आणि इतर शेजारी परिसरातील आहेत, असे रेवाडीचे डीएसपी हंसराज यांनी सांगितले.

हे वाचा - नुसरतने लग्न अचानक अवैध का ठरवलं? पहिल्यांदाच समोर आला पती निखील जैनचा खुलासा

हा व्हिडिओ नेमका कोणाच्या मोबाईलवर शूट झाला आणि तो कोणा-कोणाला पाठवला गेला आणि त्यांनी कोणाला शेअर केला आहे, याची पोलीस सध्या माहिती घेत आहेत. या अल्पवयीन आरोपींची सध्या सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून अल्पवयीन मुलांनी केलेल्या या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

First published:

Tags: Gang Rape, Rape, Rape on minor