मुलींना प्रौढ बनवण्यासाठी औषधं देणाऱ्यांविरोधात होणार कडक कारवाई

मुलींना प्रौढ बनवण्यासाठी औषधं देणाऱ्यांविरोधात होणार कडक कारवाई

POCSO : अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण तसंच बलात्कारासारख्या घटना रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पोस्को कायद्यात सुधारणा केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जुलै : अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण तसंच बलात्कारासारख्या घटना रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पोस्को कायद्यात सुधारणा केल्या आहेत.  यामध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं चाइल्ड पॉर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आली आहे. या सुधारणा संसदेत मांडलेल्या नवीन पोस्को बिलमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. फोटो, डिजिटल पॉर्नोग्राफीवरही आळा घालण्यासाठी मंत्रालयानं तरतूदी केल्या आहेत. जर हे बिल पारित करण्यात आलं तर या सर्व बाबी POCSO कायद्यानुसार दंडनीय असतील. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं बाल लैंगिक गुन्हे संरक्षण कायद्यांतर्गत अश्लील कार्टून आणि अश्लील अ‍ॅनिमेटेड फोटोदेखील दंडनीय गुन्ह्यांच्या श्रेणीत आणण्याची बाब नमूद केली आहे.

(पाहा : बापाने मुलाला बंदुकीत भरायला लावल्या बुलेट्स, भलतेच संस्कार देणारा VIDEO व्हायरल)

लहान मुलांची नक्कल करणाऱ्या पॉर्नवरही कारवाई

नवीन POCSOअ‍ॅक्टनुसार जर एखादी व्यक्ती अश्लील व्हिडीओ किंवा फोटोमध्ये लहान मुलांची नक्कल करत अश्लील कृत्य करताना आढळल्यास याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. तसंच अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीची सर्व माहिती सरकारकडे नोंद करण्यात येणार आहे.

(पाहा : मी मरेन पण.., दलित मुलाशी लग्न करणाऱ्या भाजप आमदाराच्या मुलीचा VIDEO व्हायरल)

मुलांना प्रौढ बनवण्यासाठी औषधं देणाऱ्यांवरही कडक कारवाई

लहान मुलांना लवकर प्रौढ करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल तसंच औषधांचा वापर करणाऱ्यांविरोधातही कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, ही सुधारणादेखील महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालयानं POCSO कायद्यांतर्गत आणण्यास सांगितली आहे. कोणतीही व्यक्ती जर एखाद्या लहान मुलीला किंवा मुलाला प्रौढ करण्यासाठी औषधं तसंच इंजेक्शन देण्याचा गुन्हा करत असेल तर त्याला कमीत कमी 5 वर्षांची शिक्षा करण्यात येईल. ही शिक्षा वाढवून 7 वर्षांपर्यंतही करण्यात येईल. शिवाय, केलेल्या गुन्ह्यासाठी दंडदेखील भरावा लागेल. तसंच हा गुन्हा करण्यास एखाद्याला प्रेरित केल्यास, यासाठी आमिष दिल्यास किंवा एखाद्याला मजबुरीनं हे वाईट कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्याविरोधातही हीच शिक्षा लागू केली जाईल.

(पाहा : VIDEO : 3 वर्षांचा चिमुरडा गटारात पडला, मुंबई पालिकेचे अधिकारी बोलायला तयार नाही)

राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध आहे का? अशोक चव्हाण म्हणतात...

First published: July 11, 2019, 10:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading